अभिनेता सलमान खानने घेतली कोरोना लस

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

'आपण कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.' अशा आशायाचे त्याने ट्विट केले आहे.

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सलमान खान मुंबईतील लिलावती रुग्णालयात दुपारी पोहचला. लिलावती रुग्णालयामध्य़े जातानाचे सलमानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले. सलमान रुग्णालयामध्य़े का चालला आहे? तो कोरोनाची लस घेण्यासाठी जात आहे का? असे अनेक प्रश्न नेटीझन्सनी विचारले. अखेर सलमानने या संबंधीचा खुलासा केला.

सलमानने इतर बॉलिवूड कलाकारांप्रमाणे सोशल मिडियाच्या ट्विटरवरुन ट्विट करत आपण कोरोनाची लस घेतली असल्याचे सांगितले. त्याने ट्विटमध्ये 'आपण कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.' अशा आशायाचे त्याने ट्विट केले आहे. त्यामुळे सलमान कोणत्या कारणासाठी लिलावती रुग्णालयामध्ये गेला होता याचे कारण समोर आले आहे. (Corona vaccine taken by actor Salman Khan)

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान कोरोना पॉझिटिव्ह

सलमान गेल्या काही दिवसांपासून त्य़ाच्या आगामी 'राधे' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिध्द डान्सर प्रभुदेवा करत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी, रणदिप हुड्डा, जॅकी श्रॉफ हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सलमानचा हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने या चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले होते. ईदलाच येणार... एक बार जो मैंने....असे कॅप्शन दिले आहे.

आगामी काळात सलमान ‘कीक 2' 'टाइगर 3' तर 'कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटातून झळकणार आहे.

 

संबंधित बातम्या