Coronavirus: हृतिक रोशन सह हॉलिवूड कलाकारांची भारताला मोठी मदत

दैनिक गोमंतक
सोमवार, 3 मे 2021

देश सध्या कोरोना विषाणूच्या अत्यंत प्राणघातक दुसर्‍या लाटेशी झुंज देत आहे.

देश सध्या कोरोना विषाणूच्या अत्यंत प्राणघातक दुसर्‍या लाटेशी झुंज देत आहे. रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेचे सातत्याने वृत्त कानावर येत आहे. ऑक्सिजन अभावी बर्‍याच लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. अशा परिस्थितीत सर्व सेलिब्रिटी गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्नही करत आहेत. आता हृतिक रोशनने भारताला मदत करण्यासाठी सुरू केलेल्या निधी उभारणी शिबिरास आर्थिक पाठबळ दिले. विशेष म्हणजे या निधी उभारणी शिबिराच्या माध्यमातून अनेक परदेशी सेलिब्रिटीही भारताला आर्थिक मदतीसाठी पुढे आले आहेत. (coronavirus: Hollywood actors with Hrithik Roshan help India)

एक गरम चाय की प्याली हो; कंगनाने दिल्या फॅन्स ला हेल्थ टिप्स

पोस्टनुसार, हॉलिवूडचा सुपरस्टार विल स्मिथ फॅमिलीने  50,000 डॉलर  दान केले आहेत. सीन मेंडिसने तितकीच रक्कम दिली आहे. द एलन शोने  59,000 डॉलर दिले आहेत. ब्रेंडन बर्चार्ड आणि रोहन ओझा यांनी 50,000 डॉलर तर जेमी कारेन लिमा यांनी एक लाख डॉलर्स दान केले आहेत. कॅमिला कॅबेलोने 6,000 डॉलर दिले आहेत, तर हृतिक रोशनने 15,000 डॉलर्स दान केले आहेत. त्यांच्या चॅनेलद्वारे मदतीचे आमंत्रण आणि स्वत: देणगी दिल्याबद्दल जय यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.

जय म्हणाले की या निधी उभारणी शिबिराद्वारे आतापर्यंत  36,88,981 डॉलर म्हणजे सुमारे 27 कोटी 35 लाख रुपये जमा झाले आहेत. हृतिक रोशन यांनीही जयचे अभिनंदन केले. लेखक आणि लाईफ कोच प्रशिक्षक जय शेट्टी यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. या पोस्टनुसार जगभरातील सेलेब्सनी गिव्ह इंडियाच्या माध्यमातून आर्थिक योगदान दिले आहे. जय यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jay Shetty (@jayshetty)

संबंधित बातम्या