Shubhman Gill-SaRa Ali Khan: सारा का सारा सच है!

सारा अली खानशी डेटिंगबाबत क्रिकेट शुभमन गिलचा मुलाखतीत खुलासा
Sara Ali Khan Shubhaman Gill
Sara Ali Khan Shubhaman Gill Dainik Gomantak

Shubhman Gill-SaRa Ali Khan Dating: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्यात गेल्या काही काळात जवळीकता निर्माण झाली आहे. याबाबत शुभमनला छेडले असता त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Sara Ali Khan Shubhaman Gill
IFFI 2022 Goa: 'इफ्फी'त स्पॅनिश फिल्ममेकर कार्लोस सौरा यांचा सत्यजित रे जीवन गौरव पुरस्काराने गौरव होणार

सुप्रसिद्ध पंजाबी चॅट शो 'दिल दीयां गल्लां' यामध्ये शुममन सहभागी झाला होता. त्यात त्याला बॉलीवुडमधील सर्वात फिट अभिनेत्री कोण आहे? असा सवाल केला गेला. त्यावर शुभमनने लगेचच सारा अली खानचे नाव घेतले. त्यानंतर लगेचच त्याला तो सारा अली खानला डेट करत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर शुभमनने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला. शुभमन याने एकाच शब्दात उत्तर दिले. तो म्हणाला की, 'कदाचित!'

दरम्यान त्यानंतर शुभमनला 'सारा का सारा सच बताईए' असा सवाल केला गेला. त्यावर शुभमन लाजला. त्याने 'सारा दा सारा सच बोल दिया. कदाचित होय, कदाचित नाही!'' असे उत्तर दिले.

Sara Ali Khan Shubhaman Gill
Bollywood मधील 'हे' सेलेब्स बनले रंगभेदाचे शिकार

गेल्या काही दिवसात या कपलला अनेक ठिकाणी स्पॉट केले गेले होते. मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये त्यानंतर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ते एकत्र दिसले होते. त्यानंतर दिल्ली-मुंबई विमानप्रवासातही दोघे सोबतच होते. याचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यात सारा काही चाहत्यांसोबत फोटो घेताना दिसते तर त्यात तिच्या जवळच्या सीटवर शुभमन बसलेला दिसतो.

दरम्यान, क्रिकेटरशी अफेयर करण्याबाबत साराच्या कुटूंबातील इतिहास रंजक आहे. साराची आजी अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार मन्सुर अली खान पतौडी यांच्याशी विवाह केला. साराची आई अभिनेत्री अमृता सिंग हीचेही क्रिकेटपटू रवी शास्त्रीसोबत अफेयर होते. हे दोघेही तेव्हा टॉक ऑफ द टाऊन बनले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com