‘इफ्फी’त गर्दी होणारे उपक्रम रद्द

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

कोरोनाचा प्रसार टाळता यावा, म्हणून यावर्षी ओपन एअर थिएटर, चिल्ड्रन लॅब, चित्रपटांशी निगडित प्रदर्शने यासारखे मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे उपक्रम जाणूनबुजून घेण्यात येणार नसल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली. 

पणजी  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १६ ते २४ जानेवारी या कालावधीत होणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रसार टाळता यावा, म्हणून यावर्षी ओपन एअर थिएटर, चिल्ड्रन लॅब, चित्रपटांशी निगडित प्रदर्शने यासारखे मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे उपक्रम जाणूनबुजून घेण्यात येणार नसल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी दिली. 

कोरोना लाटेच्‍या दुसऱ्या टप्‍प्‍यात बदललेल्या स्थितीमुळे इफ्फीच्या उद्‍घाटन सोहळ्याच्या नियोजनात ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. हा सोहळा पार पडणार होता. मात्र, कला अकादमीऐवजी आता काळजी म्हणून हा कार्यक्रम श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर घेण्यात येणार आहे. येथे उपस्थितांच्या आसनात १ मीटरचे अंतर असणार आहे. यासंदर्भात केंद्रीय महिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत बोलणे झाले आहे. या कार्यक्रमात आणि नंतर महोत्सवातसुद्धा सर्व प्रकारची काळजी घेणार असल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली. 

युकेमधील विमाने सध्या देशात येऊ शकत नाहीत. येत्या काही दिवसात काय स्थिती असेल याचा अंदाज आपल्यातील कोणालाच नाही. परीक्षणासाठी येणारे अनेक परीक्षक हे भविष्यात विमानबंदी असेल की नाही, याबद्दलसुद्धा साशंकता असल्याची माहिती फळदेसाई यांनी दिली. गोव्यात होणाऱ्या ५१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत १५०० पर्यंत प्रतिनिधींनी नावनोंदणी केली असून २५०० पर्यंतची नोंदणी करून घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

 

संबंधित बातम्या