‘अनादर राऊंड’ने 'इफ्फीचा' पडदा उघडणार

Danish filmmaker Thomas Vinterbergs Another Round will be the opening film at the 51st edition of International Film Festival of India
Danish filmmaker Thomas Vinterbergs Another Round will be the opening film at the 51st edition of International Film Festival of India

पणजी :   ५१ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) येत्या १६ जानेवारीपासून सुरू होणार असून शुभारंभाचा चित्रपट म्हणून प्रख्यात डॅनिश दिग्दर्शक थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘अनादर राऊंड’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवलेल्या मॅड्स मिक्केल्सनने अभिनय केलेला हा चित्रपट यंदाच्या इफ्फीमधील मोठे आकर्षण ठरणार आहे. डेन्मार्ककडून हा चित्रपट ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धेसाठीही पाठवण्यात आला आहे.


महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे, संदीप कुमार यांच्या ‘मेहरुन्नीसा’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर शो देखील महोत्सवादरम्यान होणार आहे. फारुख जाफर या कसलेल्या अभिनेत्याची भूमिका असलेल्या या चित्रपटात, एका स्त्रीच्या स्वप्नांची कथा रेखाटण्यात आली आहे.कियोशी कुरोसावा यांचा ऐतिहासिक मनोरंजक चित्रपट ‘लाईफ ऑफ अ स्पाय’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता २४ जानेवारीला होणार आहे. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या जपानी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा ‘सिल्व्हर लायन’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.


५१ व्या इफ्फीचे गोव्यात १६ ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच हा महोत्सव, अर्धा ऑनलाईन, तर अर्धा प्रत्यक्ष स्वरूपात भरवला जात आहे. या महोत्सवात जगभरातील एकूण २२४ चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात २१ नॉन-फिचर (माहिती-लघुपट) आणि २६ फिचर फिल्म (कथापट) दाखवले जातील.दरम्यान, ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com