वाढदिवसा दिवशी उर्वशी रौतेलाने कापले चक्क 10 किलो कांदे

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

उर्वशी रौतेला आपल्या वाढदिवसाच्या निमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कांदे कापताना दिसत आहे.

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकत आहे. त्याच बरोबर सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातूनही ती लोकांची मने जिंकतांना दिसत आहे. उर्वशी रौतेला कधी तिच्या स्टाईलिश लूक ने कधी महागड्या ज्वेलरीद्वारे तर कधी डान्स व्हिडिओंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करतांना आपल्याला दिसते. याच दरम्यान उर्वशी रौतेला आपल्या वाढदिवसाच्या निमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कांदे कापताना दिसत आहे.

"माझ्या वाढदिवशी 10 किलो कांदे कापून घेतल्याबद्दल धन्यवाद. हे फक्त तुम्हीच करू शकता. @Cznburak. एक दिवस मी प्रेमात रडणार आहे." असे कॅप्शन तिने या व्हिडिओला दिले आहे. या व्हीडिओमध्ये उर्वशी रौतेला तीच्या सोबत असेलेल्या व्यक्तीबरोबर कांदा कापण्याचे आव्हान स्विकारतांना दिसून येत आहे. या व्हिडिओमधील त्याचे एक्सप्रेशन आश्चर्यकारक आहेत. या व्हिडिओला एका तासात हा 7 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 

येथे बघा व्हिडिओ

उर्वशी रौतेलाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी बरीच प्रतिक्रिया दिली आहेत. उर्वशी रौतेला सध्या मोहन भारद्वाजच्या 'ब्लॅक रोज'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा त्यांचा पहिला द्विभाषिक चित्रपट असेल जो प्रसिद्ध लेखक शेक्सपियरच्या नाटक 'द मर्चंट ऑफ वेनिस' वर आधारित आहे. यापूर्वी त्यांचा 'व्हर्जिन भानुप्रिया' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. उर्वशी रौतेलाचे नवीन व्हिडीओ सॉंग 'वो चांद कहा से लाओगी' नुकतेच प्रसिद्ध झाले. या गाण्यात ती टीव्ही स्टार मोहसिन खान सोबत दिसली होती. उर्वशी रौतेलाने सनी देओलबरोबर बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 'सिंह साहेब द ग्रेट' हा तीचा पहिला चित्रपट होता.

 

संबंधित बातम्या