एव्हर ग्रीन चित्रपट 'डीडीएलजे'ने पूर्ण केली २५ वर्षे

DDLJ completed successful 25 years in the bollywood
DDLJ completed successful 25 years in the bollywood

मुंबई- भारतात असंख्य चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट काढलेत. काही चित्रपटांना त्यांच्या वेगळेपणामुळे ओळख मिळाली. मात्र,  त्यातही ''डीडीएलजे'' सारखे भाग्य लाभलेले चित्रपट खूप कमी आहेत. बॉलीवूडमधला एक ट्रेंड सेटर चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाते. 90 च्या दशकातील त्यावेळच्या बहुतांशी प्रत्येकाने हा चित्रपट पाहिला होता. कायम मनात घर करुन राहणारी गाणी, प्रभावी संवाद,  लक्ष वेधून घेणारे छायाचित्रण, यासारख्या कित्येक गोष्टींनी डीडीएलजे अर्थात दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे बॉलीवूडमधला ऑलटाईम फेव्हरेट चित्रपट ठरला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या चित्रपटाच्या काही जुन्या आठवणींना दिलेला हा उजाळा.

''डीडीएलजे'' मध्ये शाहरुख खान, काजोल, अनुपम खेर, करण जोहर, उदय चोप्रा, सरोज खान, फराह खान यांनी या चित्रपटाविषयीच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. त्यातल्या निवडक 10 गोष्टी ''डीडीएलजे'' च्या चाहत्यांसाठी. 

1. ब-याचजणांना शाहरुखने ''डीडीएलजे'' कथा ऐकल्यानंतर लगेच होकार कळवला असेल. असे वाटण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात शाहरुखने या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर आपण यात काम करणार नाही असे सांगितले होते. त्याला अशाप्रकारची रोमाँटिक फिल्म नको होती. आपण या चित्रपटात दाखविण्यात आलेल्या हिरोच्या भूमिकेसाठी फारच ज्येष्ठ आहोत असे त्याचे म्हणणे होते.

2 . शाहरुखने या चित्रपटात राज नावाच्या तरुणाची भूमिका केली आहे. त्याच्यामते, हे पात्र अतिशय नाजूक आणि दुबळ्या स्वरुपाचे होते. मला तरी ही भूमिका करताना तसे जाणवल्याचे शाहरुखने सांगितले.

3. ''डीडीएलजे'' मध्ये शाहरुखला मारधाड हवी होती. त्याशिवाय हा सिनेमा जास्त प्रभावी होणार नाही असे त्याचे मत होते. यावर चित्रपटाचे निर्माते आदित्य आणि यश चोप्रा यांच्यात काही एकमत होईना. मात्र सर्वात शेवटी दाखविण्यात आलेल्या मारहाणीच्या प्रसंगामुळे हा सिनेमा रंगतदार झाला असे म्हटले गेले.

 4. ''डीडीएलजे'' मध्ये सर्वात गाजलेले गाणे म्हणजे ' तुझे देखा तो ये जाना सनम' हे होय. हरियाणातील एका शेतात हे गाणे चित्रित करण्याचे ठरले. परंतू चित्रिकरणासाठी त्या गावातील पंचायतीकडून परवानगी मिळेना. त्या गावातील गावक-यांनी देखील त्य़ाला विरोध करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर आमच्या जागेत शुटिंग करण्याची तुमची हिंमतच कशी झाली असा दमही निर्मात्यांना दिला होता.

5.  शाहरुख आणि अमरीश पुरी यांच्यातील प्रचंड गाजलेला सीन म्हणजे कबुतरांना दाणे टाकण्याचा. हा ''आओ, आओ'' चा सीन या दोघांनी अतिशय उस्फुर्तपणे केला होता. असे म्हटले जाते. त्यांना या सीनसाठी विशेष कुठल्याही सुचना दिग्दर्शकाने दिल्या नव्हत्या. प्रत्यक्षात त्या दोघांनीही या सीनला अजरामर करुन टाकले.
6.  मेरे ख्बाबो में जो आये या गाण्याच्या चित्रिकरणा दरम्यान काजल अनेकदा अडखळली होती. हे गाणं व्यवस्थित पार पडावे यासाठी तिने अनेकदा रिटेक घेतले. तिला टॉवेल लावून गाणे शुट करण्याची आयडिया पसंत नव्हती. तिने याविषयी निर्माता आदित्य चोप्रालाही विचारणा केली होती. फारवेळ समजूत घातल्यानंतर ती ते गाणे तयार करण्यासाठी तयार झाली.

7.  या गाण्यासाठी जो स्कर्ट काजलने घातला होता. तो ऐनवेळी सेटवर कापून आणखी शॉर्ट करण्यात आला. मनीष आणि त्याच्या टीमने वेशभूषेचे काम घेतले होते. आदित्य चोप्रा यांच्या मते, तो स्कर्ट त्या गाण्यासाठी खूपच लांब होता. त्यामुळे तो कमी करुन योग्य पध्दतीने दिसेल याची काळजी घ्यावी लागणार होती.

8.  साधारण 3 ते 4 आठवड्यातच आदित्य चोप्राने डीडीएलजेची संहिता लिहिली. त्यात करण जोहर मात्र दरवेळी नवनवीन बदल सुचवत होता. वास्तविक आदित्य संहितेविषयी करणशी चर्चा करत असायचा. करणनला ऐनवेळी त्यात काही बदल हवे असल्याने त्याचा परिणाम चित्रिकरणावर झाल्याचे दिसून आले.

9.  डीडीएलजेचे पूर्ण चित्रिकरण झाल्यानंतरही आपण जे काही बनवले आहे ते प्रेक्षकांना आवडेल की नाही याबद्दल संपूर्ण टीमच्या मनात भीती होती. आपण तेच त्या प्रकारचे जूने असे काही बनवले असून ते प्रेक्षकांना आवडणार नाही हे काजोलचे मत होते. यावर माझा चित्रपट हा काही फार वेगळा नसून तो एक व्यावसायिक चित्रपट असल्याचे म्हटले होते.

10. अनुपम खेर यांनी आपल्या भूमिकेबद्दल आदित्य चोप्राला विचारणा केली होती. त्यांचे म्हणणे होते की, मला अमरीश पुरी यांच्यापेक्षा मोठा रोल का मिळाला नाही. यावर अमरीशजींना तो रोल फार आवडला होता. आणि तो करण्याची इच्छा प्रदर्शित केल्याचे चोप्रा यांनी सांगितले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com