'मार्व्हल युनिव्हर्स'चा डेडपूल पून्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ; ‘अ‍ॅडल्ट सुपरहिरो’ला हिरवा कंदिल

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

जगभरात लोकप्रिय सुपरहिरो असलेला 'डेडपूल' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जगभरात लोकप्रिय सुपरहिरो असलेला 'डेडपूल' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आक्षेपार्ह भाषा आणि इंटिमेट सीन्सचा वापर यामुळे दोन चित्रपटानंतर थांबवण्यात आलेली डेडपूल फ्रेंचाईजी आता लवकरच तिसऱ्या भागात येणार आहे. 

मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचे विशेष कार्यकारी अधिकारी केव्हिन फायगी यांनी डेडपूलच्या आर-रेटेड चित्रपटांना हिरवा कंदील दाखवत थेट तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. त्यामुळे डेडपूलच्या चाहत्यांसाठी ही एक प्रकारे आनंदाची बातमी आहे.

डेडपूल एक लोकप्रिय पात्र मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्येही दाखल झाले आहे. डेडपूल फ्रँचायझीचा पुढचा चित्रपट त्यांच्याच बॅनरखाली बनविला जाईल, असे मार्व्हल स्टुडिओचे अध्यक्ष केव्हिन फायगी यांनी एका मुलाखतीवेळी सांगितले आहे. पण प्रेक्षकांना यासाठी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. कारण, मार्व्हल स्टुडिओला बरेच काम काम नव्याने उभाराव लागणार आहे.

सध्या डिस्ने कंपनीकडे मार्व्हल कंपनीचे हक्क आहेत. डिस्ने ही मुख्यत: लहान मुलं आणि कौटुंबिक मनोरंजनाला प्राधान्य देणारी कंपनी आहे. त्यामुळे डिस्नेच्या बॅनरखाली निर्माण होणारा कुठलाही चित्रपट कधीही आर-रेटेड किंवा अ‍ॅडल्ट प्रकारातील नसतो. परंतु प्रेक्षकांच्या आग्रहास्तव डिस्नेने आपला नियम अखेर मोडला आहे.

त्यामुळे आता डेडपूलदेखील मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हरर्समध्ये इतर सुपरहिरोंसोबत अॅक्शन करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.

आणखी वाचा:

विराट-अनुष्काची थेट दहशतवाद्यांशी तुलना

संबंधित बातम्या