Death Anniversary: इरफान खानच्या सुंदर आठवणी चाहत्यांच्या मनात कैद

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

 इरफानने या जगाला निरोप देवून  एक वर्ष उलटून गेलं आहे  पण आजही त्याच्या चाहत्यांना मनात इरफान जिवंत आहे. इरफान खानचा मुलगा बाबिल खानने आपल्या वडिलांच्या आठवणीत सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे.

मुंबई: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता इरफान खान यांची आज पहिली डेथ अ‍ॅनिव्हर्सरी आहे. न्यूरोइंडोक्राइन ट्यूमरच्या आजराने इरफान खान ग्रस्त होते. त्यातच 29 एप्रिल 2020 रोजी त्यांचं निधन झालं. इरफानने या जगाला निरोप देवून  एक वर्ष उलटून गेलं आहे  पण आजही त्याच्या चाहत्यांना मनात इरफान जिवंत आहे. इरफान खानचा मुलगा बाबिल खानने आपल्या वडिलांच्या आठवणीत सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे.(Death Anniversary Babil Khan said Irrfan Khan was my best friend partner brother And was a father)

बाबिल खानला पुन्हा एकदा आपले वडील इरफान खान यांच्या साध्या जिवनशैलिची आठवण झाली आहे. बाबिलने शेअर केलेल्या फोटोमध्ये इरफान खान आपल्या रूममधला लाकडी टेबल दुरूस्त करतांना दिसत आहे. 'असा एक वारसा आहे जो माझ्या बाबात आधीच रुजला होता. कोणीही कधीही त्यांची जागा घेऊ शकत नाही. त्यांच्यासारखं काम कोणीही करु शकणार नाही. माझ्यासाठी तू सर्वात चांगला मित्र, पार्टनर, भाऊ, वडील होता. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, असे कॅप्शन बाबिलने आपल्या पोस्ट ला  दिले आहे.  

CORONA: माझ्या देशाचे लोकं मरत आहेत प्लिज हेल्प करा

दिवंगत बॉलिवूड अभिनेता इरफान खानबद्दल आपल्यात नसले तरीही त्यांच्या सुंदर आठवणी आजही आपल्या चाहत्यांच्या मनात आहेत. इरफान यांचा मुलगा बाबिल नेहमीच आपल्या वडिलांच्या सुंदर आठवणी सोशल मिडियावर शेअर करत असतो. इरफान खान यांची पत्नी सुतापा सिकंदर यांनी आपल्या पतीची आठवण करत, त्यांचा सर्वात चांगला गुण म्हणजे ते कधीही खोटे बोलायचे नाही. असे म्हटले आहे. 'त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात शून्यता आली आहे. वडिलांपेक्षाही ते माझे चांगले मित्र होते त्यांच्या जाण्याने माझे आयुष्य मला रिते वाटत आहे. त्यांची जागा माझ्या आयुष्यात कुणीही घेवू शकणार नाही, असे बाबिल म्हणाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil (@babil.i.k)

संबंधित बातम्या