तारक मेहता का उल्टा चश्मा मधील या फेमस अभिनेत्याचं निधन
घनश्याम नायकDainik Gomantak

तारक मेहता का उल्टा चश्मा मधील या फेमस अभिनेत्याचं निधन

नट्टू काका उर्फ ​​घनश्याम नायक यांनी 200 गुजराती आणि हिंदी चित्रपटांसह सुमारे 350 हिंदी मालिकांमध्ये काम केले परंतु आयुष्यभर संघर्ष करत राहिले.

महाराष्ट्र: ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक, सोनी सबच्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये नट्टू काकांची भूमिका साकारत होते. या प्रतिभावान कलाकाराचे रविवारी 3 ऑक्टोबर रोजी मुंबईत निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. गेले कित्येक दिवस ते एका गंभीर आजाराशी झगडत होते.

घनश्याम यांनी रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबईच्या सुचक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षी त्यांच्या गळ्यात तब्बल 8 गाठी सापडल्या या नंतर या ज्येष्ठ अभिनेत्याची शस्त्रक्रिया झाली. असित मोदी यांनी एका दिलेल्या मुलाखतीत बोलताना नायक यांच्या निधनाची बातमी दिली.

घनश्याम नायक
अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

तारक मेहता का उल्टा चश्माचे घनश्याम नायक उर्फ ​​नट्टू काका यांचे निधन

लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये नट्टू काकाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले घनश्याम नायक यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. निर्माता असित मोदींनी ट्विटरवर ट्विट करत अभिनेत्याच्या फोटोसह "ओम शांती" लिहिले. नट्टू काका उर्फ ​​घनश्याम नायक यांनी 200 गुजराती आणि हिंदी चित्रपटांसह सुमारे 350 हिंदी मालिकांमध्ये काम केले परंतु आयुष्यभर संघर्ष करत राहिले. 77 वर्षीय अभिनेता अनेकांना प्रेरणा देतो.

Related Stories

No stories found.