जोधा अकबर मधील या अभिनेत्रीचे निधन

टीव्ही इंडस्ट्रीमधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली; सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मनीषा यादव, यांचे निधन झाले आहे.
Actress Manisha Yadav
Actress Manisha YadavDainik Gomantak

टीव्ही इंडस्ट्रीमधून (Tv Industry) एक अतिशय दुःखद बातमी समोर अली आहे. जोधा अकबर' (Jodha Akbar) 'सलीमा बेगम' मनीषा यादव (Manisha Yadav) यांचे वयाच्या 29 व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या मागे 1 वर्षांचा मुलगा (1 year) आहे.मनीषाने अगदी लहान वयातच या जगाचा निरोप घेतला असून तिचे वय फक्त 29 वर्षे होते. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बातमीनुसार मनीषाचा मृत्यू ब्रेन हॅमरेजमुळे (Brain Hemorrhage) झाला आहे. मनीषा प्रसिद्ध टीव्ही सिरीयल 'जोधा अकबर' मध्ये दिसली होती, ज्यात तिने 'सलीमा बेगम' ची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनाही मनीषाची भूमिका खूप आवडली.

Actress Manisha Yadav
Shilpa Shetty च्या घरी उत्साहात 'गणरायाचे' आगमन

टीव्ही अभिनेत्री परिधी शर्माने मनीषाच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा देताना दु: ख व्यक्त केले आहे. परिधी ही 'जोधा अकबर' मध्ये 'जोधा बाई' या व्यक्तिरेखेमध्ये दिसली होती. मनीषाचा एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत परिधीने लिहिले, 'ही बातमी हृदयद्रावक आहे. RIP मनीषा यादव. परिधी शर्मा सांगतात की, शो बंद झाल्यानंतर ती मनीषाच्या सतत संपर्कात नव्हती. परंतु मनीषा परिधीशी मुघल नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होती, यामध्ये शोमध्ये बेगम बनलेल्या सर्व अभिनेत्री होत्या. कधी कधी ती या ग्रुपच्या माध्यमातून मनीषाशी बोलायची आणि तिला या ग्रुपमधून त्याच्या मृत्यूची बातमीही मिळाली होती.

मनीषा यादवने अलीकडेच जुलैमध्ये आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता ,याचे फोटो तिने तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे शेअर करत तिने लिहिले, 'माझ्या मुलाला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझ्या आयुष्यातील कठीण काळात तू दिव्याप्रमाणे आहेस. मला तुझी आई होण्यात धन्यता वाटते. मी तुला खूप प्रेम करतो'.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com