Debina Bonnerjee: गुरमीत चौधरी अन् देबिनाच्या घरी परीचे आगमन; देबिना दुसऱ्यांदा बनली आई

Debina Bonnerjee: गुरमीत चौधरीने इंस्टाग्रामवरुन 'ही' गोड बातमी शेअर केली आहे.
Debina Bonnerjee
Debina BonnerjeeDainik Gomantak

Debina Bonnerjee: छोट्या पडद्यावरील प्रसिध्द जोडपं देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे दुसऱ्यांदा आई-बाबा बनले आहेत. या जोडप्याला पुन्हा एकदा मुलगी झाली आहे. मनोरंजन विश्वातील सर्वांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गुरमीत चौधरीने इंस्टाग्रामवरुन ही गोड बातमी शेअर केली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की 'आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा झालो. वेळेपेक्षा आधीच आमच्या बाळाचा जन्म झाला आहे. तुमचा आर्शिवाद आणि प्रेम आमच्यासोबत कायम असुद्या.'

Debina Bonnerjee and Girl
Debina Bonnerjee and GirlDainik Gomantak
Debina Bonnerjee
53rd IFFI Goa: यामी गौतमचा 'लॉस्ट' चा इफ्फीत वर्ल्ड प्रीमियर

अभिनेत्री देबिना याच वर्षी एप्रिलमध्ये पहिल्यांदा आई बनली होती. त्यानंतर आता 8 महीन्याने ती पुन्हा दुसऱ्यांदा आई बनली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा प्रश्न पडलाय की देबिनाने दुसऱ्यांदा केवळ 8 महिन्यात बाळाला जन्म कसा दिला? यावरुन देबिना आणि गुरमीत (Gurmeet Choudhary)ला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. देबिनाच्या प्रेगन्सीबाबत अधिक सांगायचे तर देबिना पहिल्यांदा सरोगसीच्या माध्यमातून आई बनली होती. त्यामुळे दुसऱ्यांदा एवढ्या लवकर आई बनणं तीला शक्य झालं.

Debina, Gurmeet and Girl
Debina, Gurmeet and GirlDainik Gomantak

दरम्यान, या लोकप्रिय जोडीने 'रामायण' या प्रसिद्ध टीव्ही सीरियलमध्ये सोबत काम केले आहे. त्यामध्ये सीता-रामच्या भूमिकेत ते झळकले होते. त्या दरम्यान देबिना (Debina bonnerjee) आणि गुरमीतचे सुर जुळले. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2011 साली लग्न केले होते. लग्नाच्या तब्बल 11 वर्षांनंतर त्यांनी पालक होण्याचा निर्णय घेतला. 2022 हे वर्ष देबीना आणि गुरमीत चौधरीसाठी आनंदाचे ठरले आहे. एकाच वर्षात दोन वेळा ते आई-बाबा बनले आहेत.

Gurmeet and Debina
Gurmeet and DebinaDainik Gomantak

देबिना बॅनर्जीने अभिनय क्षेत्रात भरपूर काम केले आहे. देबिनाने हिंदी, कन्नड, तमिळ सिनेमांमध्ये काम केले असून छोट्या पडद्यावर अनेक सीरियल्समध्ये ती झळकली आहे. संतोषी माॅं, तेनालीराम या तिच्या सीरियल खूप गाजल्या. तसेच आपल्या पर्सनल लाईफमध्ये आता ती आई बनण्याचा आनंद घेत असून देबिनाने मस्त मेर्टनिटी फोटोशूट पण केले होते.

Gurmeet Choudhary
Gurmeet Choudhary Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com