'दीपिका पादुकोण'ने तिच्या सोशल मिडिया वरच्या सगळ्या पोस्ट्स केल्या डिलिट

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत.

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरील सगळ्या पोस्ट डिलीट केल्या आहेत. यामागचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ट्विटरवर तिचे 2.7 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर 52.2 दशलक्ष लोक तिला फॉलो करतात. दरम्यान, ट्विटरवर तिने लाईक केलेल्या पोस्ट आणि तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज हायलाइट्स अजूनही दिसत आहेत. 2020 हे वर्ष दिपिका साठी फारसं चांगलं गेलं नाही, कोणतेही चित्रपट प्रदर्शित झाले नाही, याचबरोबर ड्रग सेवनाच्या अरोपाखाली एनसीबीकडून तिची चौकशीदेखील केली गेली. 

संबंधित बातम्या