यामुळे दीपिकाने तिच्या प्रोफाइलचे नाव बदलून ठेवले 'तारा'

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

वर्षानुवर्षे या चित्रपटाने आपला प्रेक्षकवर्ग तयार केला. त्याच्या सखोल लेखनासाठी, चित्रपटांबद्दल समाजातील विषद केलेली जटिलता व संदेश यांचे अनेक चाहते आहेत.

मुंबई : तमाशा चित्रपटास काल पाच वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेत्री दीपिका पदुकोणने इस्टाग्राम, ट्विटरवरचे नाव ‘तारा’ असे केले होते. ‘तमाशा’मध्ये तिने तारा नावाची भूमिका केली होती. या कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. वर्षानुवर्षे या चित्रपटाने आपला प्रेक्षकवर्ग तयार केला. त्याच्या सखोल लेखनासाठी, चित्रपटांबद्दल समाजातील विषद केलेली जटिलता व संदेश यांचे अनेक चाहते आहेत.

चित्रपटाला दिग्दर्शन, संगीत आणि मुख्य कलाकारांच्या कामगिरीसाठी नामांकन मिळाले. काल सकाळपासूनच चाहते ट्विटरवर रणबीर आणि दीपिकाची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करत होते. यामुळे #5YearsOfTamasha हा हॅशटॅग ट्रेंडिंग आहे. काही चाहते या चित्रपटाने त्यांना जीवनाचा खरा अर्थ कसा शिकविला याबद्दल बोलत आहेत.

दरम्यान,येत्या दिवसात दीपिका पती रणवीर सिंगसोबत कबीर खानच्या '83' चित्रपटात दिसणार आहे. अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याबरोबर ती शकुन बत्राच्या पुढील चित्रपटाचादेखील एक भाग आहे. तर अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्यासमवेत यांच्यासोबत ‘ब्रह्मास्त्र’ साठी काम करत आहेत. 

संबंधित बातम्या