दीपिका पदुकोण बनली लुई व्हिटॉनची पहिली भारतीय अ‍ॅम्बेसिडर

Deepika Padukone Latest News: दीपिका पदुकोण ही बॉलीवुडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री आहे.
दीपिका पदुकोण बनली लुई व्हिटॉनची पहिली भारतीय अ‍ॅम्बेसिडर
Deepika PadukoneInstagram

दीपिका पदुकोण ही बॉलिवुडमधील सर्वात प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. दीपिका सतत हिट चित्रपट देत आहे आणि आता दीपिका पदुकोण 75 व्या कान चित्रपट महोत्सवात ज्युरी सदस्यांपैकी एक म्हणून भारताचे (India) प्रतिनिधित्व करणार आहे. दीपिका सातत्याने यशाच्या पायऱ्या चढत आहे आणि नवा झेंडा फडकावत आहे. आता दीपिका पदुकोण 'लुई व्हिटॉन' ची पहिली भारतीय ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनली आहे. फ्रेंच लक्झरीने ही माहिती दिली आहे. त्यामुळे ही बातमी कळताच सिनेजगतातील सेलेब्सने या अभिनेत्रीचे अभिनंदन केले आहे. (Louis Vuitton unveils Deepika Padukone as first Indian brand ambassador news)

रणवीर सिंहला दीपिकाचा (Deepika Padukone) नेहमीच अभिमान वाटतो. अलीकडेच, जेव्हा दीपिकाची ज्युरी बनल्याची बातमी आली, तेव्हाही रणवीरने तिचे कौतुक केले. आता रणवीरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दीपिकाच्या जाहिरातीचा फोटो शेअर केला आणि लिहिले - 'सिरियस फ्लेक्स बेबी!' रणवीरचे बेबी हे कॅप्शन लोकांना खूप आवडले.

Deepika Padukone
Deepika PadukoneInstagram
Deepika Padukone
Prithviraj Movie: करोडोंचा खेळ, संजु बाबा पेक्षा खिलाडीला 12 पट जास्त फी

दीपिका-रणवीर '83' चित्रपटात (Movie) एकत्र दिसले होते. सध्या रणवीर सिंग त्याचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे कान फिल्म फेस्टिव्हलसाठी दीपिका मुंबईला (Mumbai) रवाना झाली आहे. फ्रेंच रिव्हिएरामध्ये ही अभिनेत्री आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.