Brahmastra मध्ये दीपिकाची दमदार एन्ट्री, कॅमिओची जोरदार चर्चा!

सध्या बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटाच्या चर्चेत आहे.
BRAHMASTRA
BRAHMASTRADainik Gomantak

बॉलिवूडमध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर देखिल रिलीज झाला आहे. याआधी या चित्रपटाचा टीझर आणि गाणे रिलीज करण्यात आले असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट एक सायन्स फिक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया-रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna) आणि मौनी रॉय (Mouni Roy) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (deepika padukone cameo ranbir kapoor alia bhatt brahmastra movie)

या चित्रपटामध्ये शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) एक कॅमिओ देखील दाखवण्यात येणार आहे. शाहरुख या चित्रपटात एका वैज्ञानिकाची भूमिका साकारणार आहे. पण आता दीपिका पदुकोणही (Deepika Padukone) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटात दीपिकाची छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असे सांगितले जात आहे. पण दीपिकाच्या टीमकडून किंवा निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

BRAHMASTRA
Brahmastra Trailer: रणबीर-आलियाच्या रोमान्ससह ट्रेलरमध्ये अ‍ॅक्शनचा तडका

* दीपिकाच्या नावामुळे ब्रह्मास्त्र चर्चेत...

अयान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या (Movie) माध्यमातून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पहिल्यांदाच पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे.

‘स्टार स्टुडिओ’, ‘धर्मा प्रोडक्शन’, ‘प्राइम फोकस’ आणि ‘स्टारलाईट पिक्चर्स निर्मित’ हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग या वर्षाच्या अखेरीस 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रणबीर आणि दीपिका शेवटचे 'ये जवानी है दिवानी' मध्ये एकत्र दिसले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com