Deepika SRK: दीपिकाची बॉलिवूडमध्ये 15 वर्षे पूर्ण, शाहरुखने दिल्या खास शुभेच्छा

शाहरूख आणि दीपिकाचा 'ओम शांती ओम' चित्रपट 2007 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
Deepika Padukone and Shah Rukh Khan
Deepika Padukone and Shah Rukh KhanDainik Gomantak

शाहरूख आणि दीपिकाचा 'ओम शांती ओम' चित्रपट 2007 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाच्या रिलीजला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत, याचसोबत दीपिकानेही हिंदी चित्रपटसृष्टीत 15 वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनेत्री दीपिका पदुकोणने बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खानसह या चित्रपटाद्वारे पदार्पण केले आणि पहिल्याच चित्रपटापासून लोकांच्या हृदयात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली.

Deepika Padukone and Shah Rukh Khan
The Mystery Lady: ऐतिहासिक! 2,000 वर्षांहून अधिक जुन्या 'ममी'चा चेहरा पुन्हा केला तयार

दीपिका पदुकोणने बॉलिवूडमध्ये 15 वर्षे पूर्ण केल्या निमित्ताने शाहरुख खानने दीपिकाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख खानने त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटांमधील विविध दृश्यांचा कोलाज शेअर केला आहे, ज्यामध्ये दीपिका आणि शाहरुख चित्रपटांमधील वेगवेगळ्या दृश्यांमध्ये एकमेकांच्या डोळ्यात पाहताना दिसत आहेत.

Deepika Padukone and Shah Rukh Khan
Ginger Halwa: आल्याचा हलवा! हिवाळ्यात फिट राहण्याचे रहस्य, जाणून घ्या रेसिपी

"अप्रतिम 15 अप्रतिम वर्षे... चिकाटी... तुझ्यासोबत अप्रतिम कामाची... उबदार मिठी. अजूनही तुझ्याकडे पाहत आहे आणि तुला पाहत आहे.. आणि अजूनही तुझ्याकडे पाहत आहे….असे कॅप्शन शाहरुख खानने या फोटोला दिले आहे.

शाहरुख खानच्या या पोस्टवर दीपिका पदुकोणनेही हृदयस्पर्शी प्रत्युत्तर दिलेआहे. शब्द आमच्या प्रेमाचे वर्णन करू शकत नाहीत. अशी प्रतिक्रिया दीपिकाने दिली आहे. दीपिकाने शाहरुख खानसोबत 'ओम शांती ओम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दीपिका पदुकोणने त्याच्यासोबत 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'हॅपी न्यू इयर'मध्ये काम केले आहे. आता 'पठाण' चित्रपटात दोघे एकत्र दिसणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com