Deepika in Oscar 2023 : बेशरम गर्ल दिसणार आता 'ऑस्कर'च्या स्टेजवर...

अभिनेत्री दीपिका पदुकोण आता ऑस्कर सोहळ्यात परफॉर्मन्स करणार आहे.
Deepika Padukone
Deepika PadukoneDainik Gomantak

Deepika padukone in Oscar 2023 : अभिनेत्री दीपिका पदुकोण गेल्या काही दिवसांपासुन 'पठाण'मुळे चर्चेत होती आणि आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण बॉलिवूडची ही सुंदरी ऑस्करमध्ये दिसणार आहे. साहजिकच ऑस्कर सोहळ्यात सहभागी कलाकारांच्या हृदयाची धडधड वाढणार आहे

दीपिका पदुकोणने गुरुवारी जाहीर केले की ती 95 व्या ऑस्कर सोहळ्यात सादर होणाऱ्या A-लिस्ट सेलिब्रिटींमध्ये आहे. दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही बातमी शेअर केली. 

95 व्या ऑस्करला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी बाकी असताना, अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने यंदाच्या अकादमी पुरस्कारांमध्ये सादरकर्त्यांच्या पहिल्या फेरीची घोषणा केली आणि भारताकडुन दीपिका पदुकोण त्यापैकी एक आहे.

सेलिब्रिटींच्या या यादीत रिझ अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोटसुर, ड्वेन जॉन्सन, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा मॅककार्थी, झो सल्डाना डोनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव्ह यांचाही समावेश आहे. 

पोस्ट शेअर करताना दीपिकाने इतकेच लिहिले आहे की, “#oscars #oscars95.” 95 वा अकादमी पुरस्कार 12 मार्च रोजी म्हणजेच भारतात 13 मार्च रोजी लॉस एंजेलिसच्या डॉली थिएटरमध्ये आयोजित केला आहे.

दीपिकाचा पती, अभिनेता रणवीर सिंग, या गोष्टीवर प्रचंड खुश झाला आहे उत्साहाच्या भरात त्याने तिच्या पोस्टवर टाळ्यांच्या इमोजी टाकल्या आहेत. दीपिकाची बहीण, अनिशा पदुकोण हिने "बूम." अशी कमेंट करत आपल्या दीपिकाचं कौतुक केलं आहे. दरम्यान, चाहत्यांना अशी खात्री वाटत आहे की एसएस राजामौलीचा आरआरआर ऑस्कर जिंकणार आहे.

Deepika Padukone
Sushmita Sen : या आजाराने 2014 पासून त्रस्त आहे सुष्मिता सेन आणि त्यातच आता हार्ट अ‍ॅटॅक...

एका युजरने लिहिले, "मला वाटते की आरआरआरने पुरस्कार जिंकला आहेत म्हणूनच भारतीय परफॉर्मन्स करत आहेत." " RRR ला नक्कीच ऑस्कर मिळणार आहे,"

RRR चे गाणे Naatu Naatu 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी ओरिजीनल सॉंग या कॅटेगिरीमध्ये नॉमिनेट झाले आहे आहे. तेलुगू गाणे Naatu Naatu हे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक MM कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. आणि कालभैरव आणि राहुल सिपलीगुंज यांनी गायले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com