'दीपिका पादुकोण'ने सोशल मिडियावरच्या सगळ्या पोस्ट डिलिट केल्यानंतर शेअर केला एक 'ऑडिओ मेसेज'

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जानेवारी 2021

 काल तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून तिची सगळ्या पोस्ट डिलीट केल्यानंतर बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणने आज एक ऑडिओ मेसेज शेअर केला आहे. 

मुंबई :   काल तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवरून तिची सगळ्या पोस्ट डिलीट केल्यानंतर बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणने आज एक ऑडिओ मेसेज शेअर केला आहे. "मला खात्री आहे की आपण सर्व माझ्याशी सहमत व्हाल. आपल्याला माहित आहे की २०२० हे प्रत्येकासाठी अनिश्चिततेचे वर्ष होते, परंतु माझ्यासाठी ते कृतज्ञतेचेदेखील होते ... नवीन वर्षाच्या शुभेच्छा," असा संदेश तिने ऑडिओ संदेशामध्ये सांगितले. .

 दीपिका पादुकोण सध्या राजस्थानात पती, अभिनेता रणवीर सिंगसोबत सुट्टीवर आहे. दीपिका  कबीर खानच्या 83 चित्रपटात दिसणार आहे. ज्यात रणवीर भारतीय क्रिकेट संघाचा माजी विश्वचषक जिंकणारा कर्णधार कपिल देव याच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात कपिलची पत्नी रोमी देवची भूमिका दीपिकाने केली आहे. त्यानंतर शकुन बत्राच्या एका सिनेमात ती सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसह यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

संबंधित बातम्या