दीपिका पदूकोणला कोरोनाची लागण

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

वडील प्रकाश पदूकोण, आई उज्ज्वला पदूकोण आणि बहीण अनिषा पदूकोण यांना करोना विषणूची लागण झाल्यानंतर आता दीपिका पदूकोण यांची  कोरोना टेस्ट पॉजिटिव आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणची कोरोना चाचणी (corona test) पॉजिटिव आली आहे. तिचे वडील प्रकाश पदूकोण, आई उज्ज्वला पदूकोण आणि बहीण अनिषा पदूकोण यांना करोना विषणूची लागण झाल्यानंतर आता दीपिका पदूकोण यांची  कोरोना टेस्ट पॉजिटिव आली आहे. दीपिकाने गेल्या आठवड्यातच कोरोना चाचणी केली होती, परंतु इतकी सावधगिरी पाळल्यानंतरही कोरोनाने तिला गाठले. (Deepika Padukone tests COVID-19 positive)

  मे महिना ठरणार चित्रपट प्रेमींसाठी मेजवानी

दीपिकाच्या वडिलांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दवाखाण्यात दाखल केले. त्यासह या बातमीवर विश्वास ठेवल्यास तिच्या वडिलाना पुढच्या आठवड्यापर्यंत डिस्चार्ज (Discharge) मिळू शकेल. प्रकाश पदूकोण आणि अनिषा पदूकोणची कोरोना चाचणी पॉजिटिव निघाली. तिघांनी स्वतःला होम क्वारेंटाइन (Home Quarantine)  केले होते, परंतु प्रकाश पदूकोणचा ताप कमी झाला नाही म्हणून त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले.

सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

सध्या तरी, त्यांची तब्येत आधीपेक्षा चांगली आहे. असा विश्वास आहे की लवकरच त्यांना दवाखाण्यातून सुट्टी दिली जाईल. दीपिका पदूकोणचे वडील बॅटमिंटन चॅम्पियन आहेत. 1972 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. चित्रपट जगातील बऱ्याच  कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, कार्तिक आर्यन, गोविंद, कतरिना कैफ, यांच्यासह अनेक सेलेब्रिटीना कोरोनाची लागण झाली आहे.  

संबंधित बातम्या