सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिला झटका

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

सुशांतसिंग राजपूत यांचे वडील कृष्णा किशोर सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आपल्या मुलाच्या आयुष्यावर बनवलेल्या चित्रपटांवर बंदी घालावी अशी मागणी केली होती. 

नवी दिल्ली: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे वडील कृष्णा किशोर सिंग यांनी दाखल केलेली महत्त्वपूर्ण याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. अशी मागणी करत सुशांतच्या आयुष्यावर बनविलेले चित्रपट आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित विविध प्रस्तावित प्रकल्पांवर बंदी घालावी, अशी मागणी सुशांतच्या वडिलांनी उच्च न्यायालयाकडे केली होती. (Delhi High Court has rejected the plea of Sushant Singh Rajput's father Krishna Kishore Singh.)

इतकेच नाही तर सुशांतचे वडील कृष्णा किशोरसिंह यांनी मुलाच्या जीवनावर किंवा कोणत्याही अन्य चित्रपटात नाव किंवा तत्सम पात्रांच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी करून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. : 'द जस्टिस', 'सुसाइड ऑर मर्डरः अ स्टार वॉज लॉस्ट', 'शशांक' अशा सुशांतसिंग राजपूत यांच्या जीवनावर बनविलेले हे चित्रपट आहेत.

रिया साकारणार आधुनिक महाभारतात द्रौपदीची भूमिका

14 जून 2020 रोजी सुशांतसिंग राजपूतने मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर त्याच्या हत्येचा तपास मुंबई पोलिसांच्या माध्यमातून एनसीबी आणि सीबीआयपर्यंत पोहोचला. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीच्यावर सुशांतच्या आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. यानंतर रियाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर तीचा जामीन मंजूर झाला. या प्रकरणाचा ड्रग्स च्या अॅंगलनेही तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या