Radhe: चित्रपटाच्या पायरसीवरून दिल्ली उच्च न्यायलायचे व्हॉट्सअ‍ॅपला कारवाईचे आदेश

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

'राधे- यूअर मोस्ट वांटेड' सोशल मीडियावर बेकायदेशीरपणे प्रसारित झाल्यानंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.

सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe- Your Most Wanted Bhai) 5 मे रोजी पे व्ह्यूव मॉडेल अंतर्गत झीप्लेक्सवर (ZEEPlex) रिलीज झाला होता. पण रिलीज होताच चित्रपटाला पायरसीचे ग्रहण लागले होते. पायरसी संदर्भात सलमान खानने देखील इशारा दिला होता. त्याचबरोबर झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसनेही याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आता दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) व्हॉट्सअ‍ॅपला व सोशल मीडिया साईटला राधेच्या पायरसी बद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. (Delhi High Court orders to WhatsApp take action against Radhe movie piracy)

नाईट पार्टीसाठी गेलेल्या प्रियांकाच्या मागे लागली लेस्बियन म्हणाली...

एका संकेतस्थळाच्या (Website) अहवालानुसार, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव नरुला यांच्या खंडपीठाने व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडिया साईटला आदेश दिले आहेत की, ज्या अकाउंटवरून चित्रपटाच्या लिंक बेकायदेशीररीत्या शेर केल्या किंवा विकल्या जात आहेत, ती खाती निलंबित करा. कोणत्याही प्रकारच्या पायरसीच्या विरोधात हायकोर्टाने व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर संकेतस्थळांद्वारे बेकायदेशीर साठवण, पुनरुत्पादन, वितरण, प्रसारण, कॉपी किंवा चित्रपटाची प्रत तयार करण्यास प्रतिबंधित आदेश जारी केला आहे.

'राधे- यूअर मोस्ट वांटेड' सोशल मीडियावर बेकायदेशीरपणे प्रसारित झाल्यानंतर झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसने (Zee Entertainment Enterprises) दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलमध्ये यापूर्वी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. व्हॉट्सअ‍ॅप संदर्भात कोर्टाने असा युक्तिवाद केला की व्हॉट्सअ‍ॅपच्या सेवा अटींनुसार आयपीआरचे उल्लंघन करणारा कंन्टेट प्लॅटफॉर्मवर शेर केला जाऊ शकत नाही. असे करणारी खाती निलंबित करुन संपुष्टात आणली पाहिजेत. ज्यांची नावे तक्रारीत समाविष्ट आहेत अशा लोकांची माहिती द्या, जेणेकरुन समन्स पाठवता येईल, असेही कोर्टाने इंटरनेट सर्व्हिस प्रदात्यांना निर्देश दिले आहेत. प्रभुदेवांनी राधे चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हूडा आणि गौतम गुलाटी मुख्य भूमिकेत आहेत.

 

संबंधित बातम्या