सीडी आणि डिव्‍हीडींना सिनेरसिकांची मागणी

सिनेमा, लघुपट, माहितीपट सीडी आणि डिव्‍हीडी येथे विकल्या जातात.
सीडी आणि डिव्‍हीडींना सिनेरसिकांची मागणी
Demand for CDs and DVDsDainik Gomantak

पणजी: फिल्म डिव्‍हिजन ऑफ इंडियातर्फे दरवर्षी सिनेमाशी निगडीत सीडी तसेच डिव्‍हीडी विक्रीचे दालन इफ्फी परिसरात उभारले जाते. यंदाही हे दालन थाटण्यात आले असून येथे सिनेरसिकांची गर्दी पाहायला मिळते.

सिनेमा, लघुपट, माहितीपट सीडी आणि डिव्‍हीडी येथे विकल्या जातात. महत्त्‍वाचे म्हणजे इंटरनेट आणि यू-ट्युबच्या काळातही फिल्म डिव्‍हिजनच्या सीडी आणि डिव्‍हीडीसाठी सिनेप्रेमींकडून मागणी आहे हे विशेष म्हणावे लागेल. त्‍यांची किंमत 100 ते 200 रुपयांपर्यंत आहे. यावर्षी 300 हून अधिक सीडी व डिव्‍हीडी विक्रीसाठी ठेवल्या आहेत, अशी माहीती आयोजकांकडून मिळाली. सिनेनिर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री, सिनेमॅटोग्राफर व सिनेमांशी निगडीत अन्य कामाची माहीती देणाऱ्या सीडी आणि डिव्‍हीडी येथे उपलब्ध आहेत. दिवसाला 15 ते 20 सीडी आणि डिव्‍हीडींचा खप होतो.

यावर्षी सत्यजीत रे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे त्यांच्यावर आधारीत सीडी आणि डिव्‍हीडींना जास्त मागणी आहे असे दिसून येते. दालनांशिवाय दरवर्षी भारतीय सिनेमांशी निगडीत प्रदर्शने व अन्य प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन इफ्फीत केले जायचे. मात्र यंदा कोरोनामुळे सदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले नाही. दरम्‍यान, 1948 साली फिल्म डिव्हिजन ऑफ इंडियाची स्थापना झाली. कित्येक वर्षांचे भारतीय सिनेमे, लघुपट, माहितीपट संवर्धन करून ते आजच्या नवीन पिढीपर्यंत नेण्याचे काम फिल्म डिव्‍हिजन आजही उत्तमरित्या करताना दिसते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com