ईशा अंबानीसाठी डिझाइनरने सोन्यापासून तयार केला खास लेहंगा

दैनिक गोमंतक
मंगळवार, 11 मे 2021

ईशा अंबानी पारंपरिकपासून ते वेस्टर्नपर्यंत सर्व पॅटर्नमधील पेहराव ग्रेसनं कॅरी करत असते. जेव्हा ईशाने सोन्याच्या तारांपासून  बनवण्यात आलेला लेहंगा परिधान केला होता, तेव्हा असेच काहीसे पाहायला मिळाले होते.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी(Nita Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी-पीरामल (Isha Ambani Piramal) हिचे भारतीय पारंपरिक पेहरावावर  प्रेम आहे. अनेकदा ती साडी आणि पारंपरिक पेहरावात दिसते. मेट गाला इव्हेंटमध्ये गुलाबी कार्पेटवर वॉक करणं असो किंवा स्वतःच्याच लग्नात अबू जानी संदीप खोसला (Sandeep Khosla) यांनी  डिझाइन केलेला एम्ब्रॉयडरी लेहंगा परिधान करणं असो, ईशा आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच बॉलीवूड तारकांना टक्कर देत असते. (Designer made a special lehenga from gold for Isha Ambani)

त्या' शब्दाचा अर्थ माहिती नव्हता म्हणत बबिताने मागितली माफी

ईशा अंबानी पारंपरिकपासून ते वेस्टर्नपर्यंत सर्व पॅटर्नमधील पेहराव ग्रेसनं कॅरी करत असते. जेव्हा ईशाने सोन्याच्या तारांपासून  बनवण्यात आलेला लेहंगा परिधान केला होता, तेव्हा असेच काहीसे पाहायला मिळाले होते. हा डिझाइनर लेहंगा खूप खास होता. तसेच लेहंगा तयार करणाऱ्या डिझाइनरचा हा पहिलाच भारतीय पारंपरिक पोषाख आहे. ईशाच्या या पेहरावाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. ईशाने तिच्या रिसेप्शनमध्ये सोनेरी आणि आयव्हरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. या लेहंगावर सोने व चांदीच्या तारांपासून एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. हा डिझाइनर लेहंगा तयार करण्यासाठी शीर-शिमर, सिल्क आणि टिशू फॅब्रिकचा वापर करण्यात आला होता.

यामुळे लेहंगाला चमकदार लुक मिळाला होता. इटॅलियन फॅशन हाउसने तयार केलेला हा एक कस्टम हँडमेड लेहंगा आहे. ईशाच्या आवडीनुसार यावर बारीक स्वरुपातील एम्ब्रॉयडरी केली होती होती. हा लेहंगा इटॅलियन फॅशन डिझाइनरने तयार केला होता. लक्झरी फॅशन हाउस ‘वॅलेंटिनो’कडून पहिल्यांदाच अशा प्रकारचा आउटफिट डिझाइन करण्यात आला होता. दरम्यान वॅलेंटिनोने यापूर्वी प्रियंका चोप्रा , ऐश्वर्या रॉय आणि सोनम कपूरसाठी अनेक गाउन डिझाइन केले आहेत. परंतु फक्त ईशा अंबानीच्या विशेष मागणीमुळे इटॅलियन फॅशन डिझाइनरने  लेहंगा डिझाइन केला होता.

'गो गोवा गॉन' ला 8 वर्षे पूर्ण; कुणाल खेमूने क्लिपिंग्ज शेयर करत...

या लेहंग्यामध्ये 12  पॅनलचा समावेश होता. प्रत्येक पॅनल क्रिस्टल आणि सेक्विनसह हायलाइट करत आहेत. लेहंगा सोने व चांदीच्या फ्लोरल मोटिफ्सने सजवण्यात आला होता. डिटेलिंगसाठी मुघल जाळी,जरदोजीचा वापर केला होता. लेहंग्याच्या हेमलाइनवर छोटे पॅच डिझाइन जोडण्यात आले होते. 

संबंधित बातम्या