Video: धर्मेंद्र यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; पाठदुखीच्या त्रासामुळे केले होते भरती

Dharmendra Health Update: रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच धर्मेंद्र यांनी शेअर केला व्हिडीओ!
Video: धर्मेंद्र यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज; पाठदुखीच्या त्रासामुळे केले होते भरती
Dharmendra Instagram

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 86 वर्षीय धर्मेंद्र यांना गेल्या आठवड्यात तब्येतीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर काल म्हणजेच 1 मे रोजी रात्री डिस्चार्ज देण्यात आला. घरी परतल्यानंतर त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या तब्बेतीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी ‘मी धडा शिकलो..’, असं म्हणतं एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Dharmendra Health Update News)

याआधी धर्मेंद्र (Dharmendra) यांना आणखी काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची बातमी आली होती. पण नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर धर्मेंद्र यांनी इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आता तब्येत कशी आहे आणि त्यांना रुग्णालयात का दाखल करावे लागले होते, याची माहिती त्यांनी या व्हिडीओमधून दिली आहे.

या व्हिडीओच्या (Video) माध्यमातून धर्मेंद्र म्हणाले की, ‘मित्रांनो, काहीही अति करण्याच्या भानगडीत पडू नका. मी केले आणि आता त्याचे परिणाम देखील सहन केले.’ धर्मेंद्र पुढे सांगतात की, ‘पाठीच्या स्नायूंमध्ये त्रास झाल्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये जावे लागले होते. ते दोन-चार दिवस खूप कठीण होते. पण, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि देवाच्या आशीर्वादाने मी परत आलो आहे. आता काळजी करू नका. मी स्वतःची खूप काळजी घेणार आहे.’

* लवकरच झळकणार चित्रपटात

धर्मेंद्र या वयात देखील स्वत:ला फिट ठेवतात. ते अनेकदा त्यांच्या फार्महाऊसवर पोहताना आणि व्यायाम करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर (Social Media) शेअर करतात. लवकरच ते करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटात (Movie) त्यांच्यासोबत रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.