दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात केले भरती

दैनिक गोमंतक
रविवार, 6 जून 2021

 दिलीप कुमार यांचे वय जास्त असल्याने त्यांच्याबद्दल जास्त चिंता व्यक्त केली जाते आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. दिलीप कुमार यांना मुंबईच्या पी.डी. हिंदुजा रुग्णालयात (P.D. Hinduja Hospital) दाखल आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यात त्रास होत असल्याचे पत्नी सायरा बानो यांनी सांगितले. (Dilip Kumar was admitted to the hospital)

दिलीप कुमार यांना दवाखान्यात भरती करण्यात आल्या नंतर त्यांच्या चाहत्यांकडुन चिंता केली जाते आहे. ते सध्या ९८ वर्षांचे आहेत. तरी चाहत्यांकडुन त्यांची प्रकृती स्थिर होण्यासाठी प्रार्थना केली जाते आहे. या पूर्वी देखील बॉलिवूड मधील अनेक अभिनेत्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. मात्र दिलीप कुमार यांचे वय जास्त असल्याने त्यांच्याबद्दल जास्त चिंता व्यक्त केली जाते आहे. 

'दिलीप साहेबांना तपासणीसाठी बिगर कोविड पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल खार येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्याचा त्रास आहे. डॉ.नितीन गोखले यांच्या नेतृत्वात आरोग्य सेवा कर्मचार्‍यांची टीम त्यांच्यावर उहचार करण्यात येत आहे.  कृपया सुरक्षित रहा.' असे त्यांच्या ट्वीटर वरून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या