Photo: हैदराबादमध्ये सलमान खान, चिरंजीवी आणि व्यंकटेशची रंगली डिनर पार्टी

सलमान खान चिरंजीवीच्या आगामी 'गॉडफादर' चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे
Photo: हैदराबादमध्ये सलमान खान, चिरंजीवी आणि व्यंकटेशची रंगली डिनर पार्टी
Dinner Party of Salman Khan Chiranjeevi and Venkatesh in HyderabadTwitter/Chiranjeevi

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) सध्या हैदराबादमध्ये त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंगमधून वेळ मिळाल्यानंतर, सलमान खान टॉलीवूड सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आणि व्यंकटेश दग्गुबाती यांच्यासोबत पार्टी करताना दिसला. सलमान, चिरंजीवी आणि व्यंकटेश (Venkatesh Daggubati) हे तिघेही त्यांचा खास मित्र जेसी पवन रेड्डी यांच्या घरी दिसले. जेसी पवन रेड्डीसोबतचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Kabhi Eid Kabhi Diwali)

अलीकडेच, दाक्षिणात्य अभिनेता कमल हासनचा 'विक्रम' चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर, त्याचा जवळचा मित्र चिरंजीवीने त्याच्या हैदराबादच्या घरी एक शानदार डिनरचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये सलमान खान देखील सामील झाला होता. हे फोटो चिरंजीवीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

Dinner Party of Salman Khan Chiranjeevi and Venkatesh in Hyderabad
Amrish Puri B'day: अमरीश पुरी यांना भावाने काम देण्यास का दिला होता नकार

सलमान खान चिरंजीवीच्या आगामी 'गॉडफादर' चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे, तर व्यंकटेश सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटात एक छोटी भूमिका साकारताना दिसणार आहे.

Dinner Party of Salman Khan Chiranjeevi and Venkatesh in Hyderabad
Janhvi Kapoor चे शिमरी ड्रेसमधील किलर पोज

दरम्यान साऊथ इंडस्ट्रीतील दोन सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी हे एकमेकांचे जवळचे मित्र असल्याचे म्हटले जाते. दोघांमधील बॉन्डिंग सर्वांनाच माहिती आहे. नुकतेच पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीचे दर्शन घडले आहे, जे पाहून चाहते वेडे होत आहेत. चिरंजीवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याचा जवळचा मित्र रजनीकांतची कॉपी करताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com