दिग्दर्शक निशिकांत कामतचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

निशिकांत कामत हा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक होता. दिवंगत दिग्दर्शक विनय आपटे यांच्याकडे त्याने सहायक म्हणून करिअरला सुरुवात केली. तेथे दिग्दर्शन वगैरे धडे घेतल्यानंतर अस्मिता चित्रच्या सातच्या आत घरात या चित्रपटात त्याने काम केले.

मुंबई: डोंबिवली फास्ट, लय भारी, दृश्यम, मदारी अशा एकापेक्षा एख सरस कलाकृती देणार दिग्दर्शक निशिकांत कामतचे (वय ५०) आज निधन झाले. तो अविवाहित होता. निशिकांत कामत यांना लिव्हर सोरायसीसचा त्रास झाला होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी तो हैदराबादला गेला होता. तेथील एआयजी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अतिदक्षता विभागात त्याला ठेवण्यात आले होते. अखेर त्याची प्राणज्योत आज माळवली. 

 

 

निशिकांत कामत हा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा दिग्दर्शक होता. दिवंगत दिग्दर्शक विनय आपटे यांच्याकडे त्याने सहायक म्हणून करिअरला सुरुवात केली. तेथे दिग्दर्शन वगैरे धडे घेतल्यानंतर अस्मिता चित्रच्या सातच्या आत घरात या चित्रपटात त्याने काम केले. त्यानंतर तो हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळला. हिंदीत उत्तम कलाकृती त्याने दिग्दर्शित केल्या. तसेच ज्युली २ व रॉकी हॅण्डसम या चित्रपटामध्ये काम केले आहे. आता त्याचे दरबार या चित्रपटावर काम सुरू होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या