
Golden Globe RRR RRR Sequel: गेल्या काही वर्षात साऊथच्या सिनेमांना मिळणारा प्रतिसाद बघता, यशस्वी चित्रपटांचे समीकरण आता दक्षिनेच्या कथांचा आणि दिग्दर्शनातुन जुळणार असंच म्हणावं लागेल. कारण गेल्या पाऊण दशकातला प्रवास बघता साऊथचा सिनेमा म्हणजे हमखास यश असाच फंडा सेट होताना दिसतोय.
हे चित्रपट फक्त बॉक्स ऑफिसवरच नव्हे तर पुरस्कारांच्या शर्यतीतही आपले नाव कोरले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली दिग्दर्शित 'RRR' या चित्रपटाने एक नवी यशोगाथाच लिहिली आहे.
या चित्रपटातील 'नाटु नाटु' या गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.
चाहत्यांसाठी आता याहुन आनंदाची बातमी म्हणजे या चित्रपटाचा सिक्वल आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या इंटरनॅशनल अवॉर्ड फंक्शनमध्ये दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी एका मुलाखतीदरम्यान चित्रपटाच्या सिक्वेलची पुष्टी केली आहे.
' 'जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा त्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हाच आम्हाला या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची कल्पना आली. आमच्याकडे काही कल्पना होत्या, परंतु त्यापैकी कशावरही मी समाधानी नव्हतो.
राजामौली पुढे म्हणाले की, या चित्रपटाला पाश्चिमात्य देशांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. काही आठवड्यांपूर्वी मी माझ्या वडिलांशी आणि माझ्या चुलत भावाशी याबद्दल चर्चा करत होतो. मात्र, स्क्रिप्ट पूर्ण होईपर्यंत आम्ही त्यावर जास्त बोलू शकत नाही, पण आमचं काम सुरू आहे हे नक्की.
'RRR' मधील ''नाटु नाटु' ने गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स 2023 मध्ये मूळ गाण्याच्या श्रेणीत सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा सन्मान जिंकला आहे, विशेष म्हणजे नामांकनांमध्ये हॉलीवूड गायिका रिहाना आणि लेडी गागा यांच्या गाण्यांना मागे टाकले आहे.
RRR' 2022 साली मार्च महिन्यात रिलीज झाला होता. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरण मुख्य भूमिकेत आहेत. राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी साकारलेल्या अल्लुरी सीताराम राजू आणि कुमारम भीम यांच्या भूमिका प्रेक्षकांनी मनापासुन स्वीकारल्या केल्या.
राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी चित्रपटातील 'नाटु नाटु' गाण्यात केलेला धमाकेदार डान्स विसरेल?
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.