Disha Patani: दिशा पटानीने टायगर श्रॉफच्या आधी 'या' अभिनेत्याला केले होते डेट

Disha Patani Birthday: टायगर श्रॉफपूर्वी दिशा पटानी एका टीव्ही कलाकारासोबत रिलेशनशिपमध्ये होती.
Disha Patani: दिशा पटानीने टायगर श्रॉफच्या आधी 'या' अभिनेत्याला केले होते डेट
Disha PataniInstagram

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी आपला ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशा तिच्या हॉट आणि सिझलिंग फोटो आणि व्हिडिओंसह सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. दिशा नेहमीच बोल्ड स्टाइल आणि बिकिनी फोटोशूटमुळे सोशल मिडीयावर चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून दिशा जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफला डेट करत आहे. (Disha Patani Birthday Special News)

दिशा आणि टायगर (Tiger Shroff) अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. दोघांचे एकमेकांवरील प्रेम जगापासून लपलेले नाही. दोन्ही लव्हबर्ड्सनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली देखिल दिली आहे. हे दोघे अशा जोडप्यांपैकी एक आहेत, ज्यांनी नेहमीच एकत्र असल्याची कबुली दिली आहे. पण टायगर श्रॉफच्या आधी दिशा पटानी कोणत्या अभिनेत्रीला डेट करत होती हे तुम्हाला माहीत आहे का?

Disha Patani
'Vikram' च्या यशाबद्दल चिरंजीवी अन् भाईजानच्या हस्ते कमल हसन यांचा गौरव

टायगर श्रॉफच्या आधी दिशा पटानी (Disha Patani) एका टीव्ही कलाकारासोबत रिलेशनशिपमध्ये होती. 'कसौटी जिंदगी' की फेम 'पार्थ समथान' या टीव्ही अभिनेता दिशाला डेट केले होते. दिशा आणि पार्थचे अनेक फोटो सोशल मीडियावर (Social Media) आहेत. फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

Disha Patani And parth
Disha Patani And parthDainik Gomantak

दिशा आणि पार्थचे नातं फार काळ टिकले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिशा आणि पार्थ एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. वर्षभर रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपमागील कारण पार्थने (Parth Samthaan) दिशाची फसवणूक केल्याचे सांगण्यात आले होते.

दिशा तिच्या सध्याच्या लव्ह लाईफ म्हणजेच टायगर श्रॉफसह खूप खूश आहे. सध्या टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या अफेअरची बरीच चर्चा सूरू आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. दिशा टायगरच्या कुटुंबाच्या (Family) खूप जवळ आहे. ती टायगरची आई आणि बहिणीसोबत हँग आउट करतांना दिसते. इतकंच नाही तर टायगर आणि दिशा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com