'अंतराने काही फरक पडत नाही' म्हणत, अंकिताने सुशांतच्या आठवणींना दिला उजाळा

'अंतराने काही फरक पडत नाही' म्हणत, अंकिताने सुशांतच्या आठवणींना दिला उजाळा
ankita lokhande.jpg

एकता कपूरच्या (Ekta Kapoor) 'पवित्र रिश्ता' (pavitra Rishta) या मालिकेमधून अभिनेत्री अंकिता लोखंडेला (Ankita Lokhande) एक नवी ओळख मिळाली होती. या मालिकेत सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आणि अंकिताने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते . अशा परिस्थितीत सुशांतचा मृत्यूला (Death) उद्या एक वर्ष होत आहे. यातच आता अंकिताने स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. कंगना राणावत (Kangana Ranaut) सोबत अंकिताने 'मणिकर्णिका' (Manikarnika) या सिनेमामध्ये दिसली होती. सुशांत आज या जगात नसला तरी अंकिता सुशांतच्या अजूनही वेगवेगळ्या प्रकारे आठवणींना उजाळा देत असते. अशातच आता अंकिताने सोशल मिडियावरील (Social media) इन्स्टाग्रामवरुन एक फोटो शेअर केला आहे. (The distance doesnt matter  Ankita said reminiscing about Sushant)

तसेच, अंकिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती समुद्राजवळ उभी असल्याचे दिसून येत आहे. तिने लाल जॅकेट आणि लोअरमध्ये दिसत आहे. असं दिसत की, ती वतावरणाचा मनमुराद असा आनंद लुटताना दिसत आहे. तिने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. अंकिता कॅप्शनमध्ये म्हणते की, 'अंतराणे  काहीच फरक पडत नाही, कारण दिवस संपेपर्यंत आपण सर्व एकाच आकाशात आहोत. या कॅप्शनच्या माध्यमातून अंकिताने सुशांतच्या चाहत्यांना एक खास संदेश दिला आहे. अंकिताच्या या इन्स्टाग्रामवरील फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

दरम्यान, 3 जून रोजी अंकिताने एक पोस्ट शेअर केली  होती , ज्यामुळे तिचे चाहते बुचकाळ्यात पडले होते. अंकिताने सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले होते की, 'काही दिवस मी सोशल मीडियापासून दूर जात आहे. हा शेवटचा निरोप नाही, मी नंतर तुम्हाला जरुर भेटेन.' मात्र अंकिताच्या या पोस्टमुळे तिचे खूप नाराज झालेले दिसले होते . दरम्यान पवित्र रिश्ताने या मालिकेने तब्बल 12 वर्षे पूर्ण केली आहेत, अशात अंकिताने लाइव्ह चॅटमध्ये सुशांतला आठवणी काढली होती. यात अंकिताने म्हटले की, सुशांत शिवाय 'पवित्र रिश्ता' अपूर्ण आहे, असं म्हणत भावनिक होताना दिसली होती. त्याचवेळी सुशांतचे निधन झाल्यानंतर, सुशांत आत्महत्या करण्यासारखं पाऊल टाकू शकत नाही असं म्हटलं होतं.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com