जया बच्चन ऐश्वर्याला कोणत्या नावाने चिडवतात माहितीयं का ?

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

ऐश्वर्याने देखील आपल्या सासूबाईंना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई: बॉलिवूमधील प्रसिध्द अभिनेत्री जया बच्चन यांचा आज 73वा वाढदिवस आहे. जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त नव्या नंदा, अभिषेक बच्चन आणि इतर अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मिडियावरुन शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याने देखील आपल्या सासूबाईंना शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या आणि जया बच्चन यांच्यात चांगले बॉडिंग आहे. एका मुलाखतीमध्ये जया बच्चन यांनी ऐश्वर्याला त्या कोणत्या नावाने चिडवतात ते सांगितलं आहे.

जया बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या सूनबाईला कशाप्रकारे चिडवत असतात हे सांगितलं होतं. ‘ऐश्वर्या एक आई म्हणून खूप काम करत असते. ती तिच्या जबाबदाऱ्या योग्य पध्दतीने पारही पाडते. मी कित्येकदा तिला चिडवत असते की आराध्या किती भाग्यवान आहे. तुम्ही कल्पना करु शकत नाही की, आराध्याकडे मिस वर्ल्ड ऐश्वर्यासारखी नर्स आहे’  असं जया यांनी म्हटले आहे. (Do you know by what name Jaya Bachchan teases Aishwarya)

अभिनेते कबीर बेदी आत्मचरित्रामधून उलगडणार आयुष्य

पुढे त्या म्हणाल्या, ऐश्वर्याने बाहेर जावून काम करायला सुरुवात करायला हवी. परंतु ती कोणावरही अवलंबून राहत नाही. खरतर ती खूप चांगली आहे. जया बच्चन यांनी कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये ऐश्वर्याचं खूप कौतुक केलं होतं. ‘’ऐश्वर्या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. मात्र ती बच्चन कुटुंबात उभी राहताना ती सर्वात शेवटी असते. उगाचचं ती पुढे-पुढे करत नाही. विशेष म्हणजे खूप शांत आणि हसऱ्या स्वभावाची आहे,’’ असं त्या म्हणाल्या होत्या.

संबंधित बातम्या