
या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'डॉक्टर स्ट्रेंज- इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' या हॉलिवूड चित्रपटाने पहिल्या वीकेंडला दमदार ओपनिंग केली आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या या चित्रपटाची जगभर प्रतिक्षा होती. भारतातील चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. 2016 मध्ये लोकांना डॉक्टर स्ट्रेंज खूप आवडले होते. आता निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग आणला आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी 'डॉक्टर स्ट्रेंज - इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' च्या पहिल्या वीकेंड कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. या चित्रपटाने वीकेंडच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवारी Box Officeवर 25.40 कोटींचा व्यवसाय केला. याआधी या चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी 28.35 कोटी आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी 25.75 कोटींचा व्यवसाय केला होता. अशा प्रकारे या चित्रपटाने तीन दिवसांत 79.50 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची ही कमाई सर्व भाषांमध्ये झाली आहे.
चित्रपटाची कमाई चांगली मानली जात आहे. मात्र नुकताच प्रदर्शित झालेला 'KGF 2' इतका हा चित्रपट लोकांना तेवढा प्रभावित करू शकला नाही. या चित्रपटात बेनेडिक्ट कंबरबॅच आणि एलिझाबेथ ओल्सन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सॅम रायमी यांनी केले आहे.
कोणत्या दिवशी किती कमाई?
शुक्रवार - रु. 28.35 कोटी
शनिवार - रु. 25.75 कोटी
रविवार - रु. 25.40 कोटी
'डॉक्टर स्ट्रेंज - इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने पहिल्या वीकेंडला जगभरात $450 दशलक्ष (34,81,02,00,000) कमाई केली आहे. दरम्यान हे दुसरे सर्वात मोठे वीकेंड ओपनिंग देखील बनले आहे. याशिवाय, मार्वलच्या ओपनिंग वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा हा चौथा चित्रपट आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.