लुप्‍त होणाऱ्या लोककलांवर प्रखरपणे बोलतोय ‘डोल्लू’

पारंपारिक कलाप्रकार टिकून राहिले पाहिजेत. ‘डोल्लू’च्या माध्यमातून शहरीकरणाचा स्थानिक लोककला प्रकारांवर कसा परिणाम होतोय हे आम्‍हाला सांगायचे आहे
Dollu is talking fiercely about the disappearing folk art
Dollu is talking fiercely about the disappearing folk artDainik Gomantak

पणजी: पारंपारिक कलाप्रकार टिकून राहिले पाहिजेत. ‘डोल्लू’च्या माध्यमातून शहरीकरणाचा स्थानिक लोककला प्रकारांवर कसा परिणाम होतोय हे आम्‍हाला सांगायचे आहे, असे अभिनेता-दिग्दर्शक सागर पुराणिक यांनी सांगितले. इफ्‍फीत पदार्पणाच्या स्पर्धा श्रेणीत भाग घेत असलेले दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल ते बोलत होते.

प्रख्यात दिग्दर्शक पवन वाडेयर आणि पत्नी अपेक्षा यांची निर्मिती असलेला हा चित्रपट डोल्लू कुनिथा या कर्नाटकातील लोकनृत्य प्रकारावर आधारित आहे, जो वाढत्या शहरीकरणामुळे हळूहळू नाहीसा होत आहे. नायक भद्रा डोल्लू ड्रमर-नर्तकांच्या टीमचे नेतृत्व करतो. उत्कटतेपेक्षा पैशाला प्राधान्य दिले जाते म्हणून संघ त्यांचे गाव सोडून महानगर बेंगळुरू येथे उतरतो. तेव्हाच भद्राला कळते की त्यांच्या गावातील मंदिराचे वार्षिक विधी संघाच्या कामगिरीशिवाय अपूर्ण राहतील. शतकानुशतके जुनी परंपरा जिवंत ठेवण्यासाठी, तो संघ पुन्हा एकत्र करण्याचा निर्णय घेतो. त्याच्या मिशनमध्ये त्याला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो तो चित्रपटाचा मुख्य भाग आहे.

Dollu is talking fiercely about the disappearing folk art
'संजीव कुमार' यांचा अभिनयातील प्रवास..

नागरीकरण ही जागतिक समस्या असल्याचे प्रतिपादन करून पुराणिक म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून कर्नाटकातील ग्रामीण भागातून मोठ्या शहरांमध्ये स्थलांतराचा एक सतत प्रवाह आहे. कारण लोकांचे राहणीमान सुधारले आहे.

पण असे करताना आपण आपली मुळे विसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोणतीही कला अशी क्षणार्धात नाहीशी होऊ शकत नाही. हजारो लोक या कला जिवंत ठेवण्यासाठी झटत आहेत. मात्र तरुणाई त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे कदाचित लोकप्रियता कमी होत आहे, अशी खंतही त्‍यांनी व्‍यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com