आमचे लोकशाही हक्क हिरावण्याचा प्रयत्न करू नका ; कंगनाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्र्यांकडे उद्धव ठाकरेंच्या, "कोणी म्हटलं की मुंबई पीओके सारखी आहे ... ते कामासाठी मुंबईत येतात आणि नंतर शहराची बदनामी करतात. ही गोष्ट नमक हारामीच आहे", या टिकेला  कंगना रानौतने ट्विटरद्वारे उत्तर दिलं.

मुंबई: मुख्यमंत्र्यांकडे उद्धव ठाकरेंच्या, "कोणी म्हटलं की मुंबई पीओके सारखी आहे ... ते कामासाठी मुंबईत येतात आणि नंतर शहराची बदनामी करतात. ही गोष्ट नमक हारामीच आहे", या टिकेला  कंगना रानौतने ट्विटरद्वारे उत्तर दिलं.

यात कंगनाने मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला 'खुली गुंडगिरी' असं म्हणलंय. ट्विटमध्ये," मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या खुल्या गुंडगिरीमुळे मी भारावून गेलीये, असं कंगना म्हणाली. आपल्या दसर्‍या संबोधनादरम्यान ठाकरे मुंबई शहरातील ड्रग रॅकेटबद्दलही बोलले आणि ते पुढे म्हणाले, "संपूर्ण शहर आणि राज्य एक ड्रग हेवन आहे हे दर्शविण्यासाठी एक आख्यायिका रंगविली गेली आहे. इथला प्रत्येकजण नशा करणारा आहे. बदनामी करण्याचा कोणताही प्रयत्न करणाऱ्यावर काटेकोरपणे कारवाई केली जाईल. "

कंगनाचे मूळ राज्य असलेल्य़ा हिमाचल प्रदेशवरदेखील मुख्यमंत्र्यांनी टिका केली होती. ते म्हणाले होते, “आमच्या घरात तुळशी पिकतात, गांजा नाही.. गांजाची शेती तुमच्या राज्यात आहेत, आमच्या महाराष्ट्रात कुठे नाहीत.” यावर उत्तर देताना,“मुख्यमंत्री, हिमाचलला देव भूमी म्हटले जाते. या ठिकाणी जास्तीत जास्त मंदिरे आहेत. खूपच सुपीक जमीन आहे ज्यामुळे तेथे सफरचंद, किवी, डाळिंब, स्ट्रॉबेरी पिकतात," अशा आशयाचं ट्विट कंगनानी केलं.

शेवटी कंगनाने मुख्यमंत्र्यांना ,“जसे हिमालयातील सौंदर्य प्रत्येक भारतीयाचे आहे, तसेच मुंबई ज्या संधी पुरवते त्या प्रत्येकाच्याच आहेत, दोन्ही माझी घरे आहेत, उद्धव ठाकरे, तुम्ही आमचे लोकशाही हक्क हिरावण्याची आणि आमचे विभाजन करण्याचा प्रयत्न करू नका”, असा इशारा दिलाय.

संबंधित बातम्या