Dr Arora: गुप्त रोगावर उपचार करण्यासाठी येतायेत डॉ.अरोरा, ट्रेलर बघून उंचावल्या भूवया...

जोपर्यंत गुप्त राहील, तोपर्यंत हा रोग कायम राहणार, ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे
Dr Arora
Dr AroraTwitter

Dr. Arora Trailer: जोपर्यंत गुप्त राहील, तोपर्यंत हा रोग कायम राहणार, ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे, पण विश्वास ठेवा.. अनेकदा लैंगिक समस्यांशी संबंधित जाहिराती पाहून असे वाटते की त्या आपल्यासाठी नाहीत. आणि आपण या समस्येला समस्या मानत नाही.

Dr Arora
B'Day Special: Ranveer Singh ने शेअर केली अतरंगी सेल्फी

'डॉ अरोरा...' नावाने सोनी लिव्हच्या नवीन वेब सिरीजचा ट्रेलर आला आहे. कुमुद मिश्रा डॉ. अरोरा यांच्या भूमिकेत असून लैंगिक समस्या सोडवताना दिसत आहे. लैंगिक प्रॉब्लेमने त्रस्त असलेले लोक डॉक्टरांना त्यांचे नावही सांगू इच्छित नाहीत हे ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. सांगितल्यास कोणाला सांगू नका, असे बंदूक दाखवून धमकावले जाते. दुसरीकडे डॉ. अरोरा एका महिलेच्या त्रासांबाबतही माहिती देतात.

वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना लैंगिकतेशी संबंधित कोणत्या ना कोणत्या समस्या येतात.त्याच गोष्टी या मालिकेत पाहायला मिळणार असून ट्रेलरवरून ही मालिका धुमाकूळ घालणार असल्याचा अंदाज लावला जातो आहे.या मालिकेत कुमुद मिश्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आणि ट्रेलरमधला त्याचा अभिनय अप्रतिम आहे. कुमुद तरीही एक अप्रतिम अभिनेता आहे आणि डॉ. अरोरच्या भूमिकेत त्यांनी जीव ओतला आहे. याशिवाय विद्या माळवदे, राज अर्जुन, शेखर सुमन, संदीपा धर, विवेक मुशरन हे कलाकार दिसणार आहेत.

Dr Arora
सलमान खानच्या वकिलाला लॉरेन्स बिश्नोईच्या गुंडाकडून धमक्या

ट्रेलरमध्ये असे अनेक डायलॉग्स आहेत जे जबरदस्त आहेत. 'लड़कियों से आकर्षण होता है सामने आते ही ऐसे सुन्न पड़ जाता है...मिस फायर हो जाता है...समय आए और कर नहीं पाए तो.' असे डायलॉग या ट्रेलमध्ये बघायला मिळाले. अरोरा शेवटी म्हणतात की, 'आमचे काम तुमच्यावर उपचार करणे आहे, तुमचे काम आहे विश्वास करणे...' तेव्हा दिग्दर्शकासह अभिनेत्यांना ही सिरीज यशस्वी होणार अशी आशा आहे. 22 जुलै रोजी ही मालिका सोनी लिव्हवर येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com