हेमा मालिनी यांना अमिताभ बच्चन यांच्या मुलाला बनवायचे होते जावई पण...

हेमा मालिनी यांना त्यांच्या सौंदर्यामुळे ड्रीम गर्ल म्हटले जात असे.
हेमा मालिनी यांना अमिताभ बच्चन यांच्या मुलाला बनवायचे होते जावई पण...
Bollywood StarsDainik Gomantak

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या मनावर राज करणारी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ राज्य केले आहे. हेमा मालिनी यांना त्यांच्या सौंदर्यामुळे ड्रीम गर्ल म्हटले जात असे. हेमा मालिनी यांनी (Hema Malini) दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांच्याशी लग्न केले. जेव्हा हेमा मालिनी यांची मुलगी लग्नासाठी योग्य ठरली तेव्हा ईशा देओलने त्यांच्या पसंतीचे लग्न करावे असे वाटत होते. (Bollywood News In Marathi)

हेमा मालिनी यांना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चनला आपला जावई बनवायचा होता. हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या अमिताभ यांच्या चांगल्या मैत्रीण आहेत. हेमा मालिनी यांना त्यांच्या मैत्रीचे नात्यात रूपांतर करायचे होते. हेमा मालिनी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाला तसेच त्यांचा मुलगा अभिषेक (Abhishek Bachchan) यांना ओळखत होत्या. अभिषेक बच्चन सर्वांनी सुसंस्कृत आणि आदरणीय होता, त्यामुळेच हेमा मालिनी यांना त्यांनी आपल्या कुटुंबाचा एक भाग व्हावे असे वाटत होते.

Bollywood Stars
सुगम संगीतातील नक्षत्रे रविवारी गोव्यात

हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल हिला हे पटले नाही आणि तिने अभिषेकसोबत लग्न करण्यास नकार दिला. ईशा अभिषेकला भाऊ म्हणून पाहते, अशा बातम्या येत आहेत. याच कारणामुळे तिने लग्नाला नकार दिला होता. यानंतर ईशा देओलने तिच्या बालपणीच्या मित्राशी लग्न केले. ईशा देओलचा नवरा बिझनेसमन आहे. त्याच वेळी, अभिषेक बच्चन ने मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायसोबत लग्न केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com