एकमेकास आनंद देणारा ‘दसरोत्सव’

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

पांडव अज्ञातवासात राहण्यासाठी ज्यावेळी विराटाच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे क्षमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तोच हा ‘विजया दशमी’चा दिवस.

विजयादशमी’ दसरा हा हिंदू सणातील मुख्य उत्सव. विजयादशमीमागे एक कथा आहे. वरतंतू ऋषीचा कौत्स्य नावाचा शिष्य विद्या अभ्यास पूर्ण करून घरी जाण्यास निघाला. त्यांनी आपल्या गुरुदक्षिणाबद्दल विचारले असता, ‘मी तुला गुरुदक्षिणासाठी शिकवले नाही’, असे गुरुंनी उत्तर दिले. परंतु कौत्स्याने आग्रह केल्याने शेवटी ऋषी म्हणाले, ‘मी तुला चौदा विद्या शिकविलेल्या आहेत, तेव्हा मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा दे.’ पण, त्या एकच दात्याने दिलेल्या असाव्यात त्यावर सिंहासनावर असलेल्या रघुराजाकडे कौत्स्य गेला. परंतु रघुराजाकडे तेवढी संपत्ती नव्हती. त्याने सर्व संपत्ती यज्ञयगात दान केली होती. अर्थलाभ होणार नाही हे लक्षात येताच कौत्स्य तेथून परत निघाला. पण, रघुराजाला हे पटले नाही. त्यांनी प्रत्यक्षात इंद्रावर स्वारी करून कौत्स्यास धन देण्यास ठरविले. 

हे इंद्राला कळताच त्यांनी क्षमी व आपट्याचा वृक्षावर मुद्राचा पाऊस पाडला. राजाने कौत्स्याला त्या मुद्रा घेण्यास सांगितले. कौत्स्याने मात्र चौदा कोटीचे मुद्रा घेतल्या. आता उरलेल्या मुद्राचे काय करावे हा प्रश्न रघुराजाला पडला. कारण या सर्व मुद्रा खऱ्या पाहता तर कौत्स्याच्याच होत्या. म्हणून मग त्याने त्या लोकांना लुटून नेण्यास सांगितले. तो दिवस विजयादशमीचा. म्हणून तेव्हापासून ‘सोने लुटने’ हा शब्द रुढ झाला असे मानले जाते.

दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासून आहे. याचदिवशी देवीनी महिषासुरानी राक्षसाचा वध केला. प्रभुरामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. त्यानंतर पांडव अज्ञातवासात राहण्यासाठी ज्यावेळी विराटाच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे क्षमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तोच हा ‘विजया दशमी’चा दिवस.तेव्हापासून आपट्याच्या झाडांना व पानाला महत्त्व प्राप्त होऊन दसरा हा उत्सव सोने वाटून दुसऱ्याला आनंद देण्याचा उत्सव मानला जातो. 
- योगिता भाऊ देसाई, 
बोळकर्णे-साकोर्डा

संबंधित बातम्या