विजय मल्ल्याकडून गोव्यातील किंगफिशर व्हिला विकत घेणारा अभिनेता गजाआड

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

सचिन जोशीने विजय मल्ल्याकडून गोव्यात किंगफिशर व्हिला विकत घेतला आहे. याशिवाय सचिन जोशी वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘प्ले बॉय’ नावाच्या क्लब आणि रेस्टॉरंट्स फ्रँचायजी चा मालक आहे. 

नवी दिल्ली: जगदिश जोशी यांचा मुलगा बॉलिवूड अभिनेता आणि उद्योगपती सचिन जोशी यांला ईडीने अटक केली आहे. ओंकार रियाल्टर्स एपिसोडमध्ये ईडीने ही कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार ग्रुप प्रमोटर आणि सचिन जोशी यांच्यात 100 कोटींच्या अवैध करारावर ही कारवाई केली गेली आहे. अटकेपूर्वी सचिन जोशी यांची 18 तास चौकशी करण्यात आली. आयकर विभागाने त्याच्या रहिवासी आणि कार्यालय परिसरात पूर्ण  शोध  केल्यानंतर त्याला अटक केली आहे.

सचिन जोशीने विजय मल्ल्याकडून गोव्यात किंगफिशर व्हिला विकत घेतला आहे. याशिवाय सचिन जोशी वेगवेगळ्या शहरांमध्ये ‘प्ले बॉय’ नावाच्या क्लब आणि रेस्टॉरंट्स फ्रँचायजी चा मालक आहे. सचिन जोशीसा ओंकार रिअल्टर्स प्रकरणामध्ये समन्स दिला होता. समन मिळाल्यानंतरही सचिन जोशी ईडी कार्यालयात हजर झाला नाही. यानंतर त्यांना दक्षिण मुंबई कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले जाईल, असेही ईडीने सांगितले आहे.

सचिन जोशीने मॉडेल आणि अभिनेत्री उर्वशी शर्माशी लग्न केले आहे. सचिन जोशीने तेलगू, कन्नड आणि काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. पान मसाल्यात वापरल्या जाणाऱ्या अन्न परफ्यूमचे उत्पादन हा सचिन जोशींचा जेएम जोशी समूहाचा मुख्य व्यवसाय आहे. याशिवाय हा हा समुह रेस्टॉरंट्स आणि मद्य व्यवसायाशीही संबंधित आहे.

ईडीने यापूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणात ओंकार समूहाचे अध्यक्ष कमल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना अटक केली आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकरणात सहभागी असलेल्या अनेक कंपन्यांपैकी ओंकार ग्रुपही एक आहे. याशिवाय मुंबईतील बऱ्याच मुख्य ठिकाणी ओंकार ग्रुपचे प्रकल्पही सुरू आहेत.

IND vs ENG: रणविरने विचारलं इंग्लंडला किती धावांचं टार्गेट द्यायचं? चाहते म्हणाले... -

संबंधित बातम्या