ईडीने नोंदवला सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा जबाब

पीटीआय
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) त्याच्या बँक खात्याची तपासणी करीत असून काल दिल्लीत त्याचे वडिल के. के. सिंह यांचा जबाब नोंदवण्यात आला. 

नवी दिल्ली:  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) त्याच्या बँक खात्याची तपासणी करीत असून काल दिल्लीत त्याचे वडिल के. के. सिंह यांचा जबाब नोंदवण्यात आला. 

सुशांतच्या खात्यातून पैसे काढले गेल्याची माहिती कशी मिळाली, असे त्यांना विचारण्यात आले. सुशांतच्या खात्यातून संबंध नसलेल्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. ते खाते अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांचे असू शकते, असा सिंह यांचा आरोप आहे. 

तसेच या प्रकरणात न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवाल महत्त्वाचा ठरणार असून त्याची ईडी वाट पाहत आहे. या अहवालातून डिलिट मेसेज आणि व्हाटसअप कॉलचे विवरण हाती लागण्याची शक्यता  
आहे. 

के. के. सिंह नंतर रिया चक्रवर्तीचे सीए रितेश शहा यांचा देखील जबाब घेतला जाणार आहे. त्यानंतर रिया चक्रवर्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी समन्स पाठवले जाणार 
आहे.

संबंधित बातम्या