Rakul Preet Singh: ईडी करणार अभिनेत्री रकुल प्रीतची चौकशी; 'हे' आहे कारण...

5 वर्षे जुन्या प्रकरणात आता पाठवले समन्स; 19 डिसेंबर रोजी चौकशी
Rakul Preet Singh
Rakul Preet SinghDainik Gomantak

Rakul Preet Singh: सक्तवसुली संचलनायलायने (ईडी) पाच वर्षांपुर्वीच्या प्रकरणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिला समन्स पाठवले आहे. तिला 19 डिसेंबर रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. रकुल प्रीतला गेल्या वर्षीही सप्टेंबरमध्ये समन्स बजावण्यात आले होते. ईडी या प्रकरणात टॉलिवूडशी संबंधित म्हणजे तेलगु चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक कलाकारांची चौकशी करत आहे.

Rakul Preet Singh
Pathaan Movie: 'पठान' रीलीज केल्यास खबरदार; 'या' राज्यातील थिएटर मालकांना हिंदुत्ववाद्यांची धमकी

ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, रकुलला ड्रग्ज आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. हे प्रकरण पाच वर्षे जुने आहे. ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित हे प्रकरण 2017 मध्ये प्रकाशझोतात आले होते तेव्हा कस्टम अधिकार्‍यांनी संगीतकार केल्विन मस्करेन्हास आणि इतर दोघांकडून 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. रवी तेजा, चार्मी कौर, नवदीप, मुमैथ खान, तनिश, नंदू, तरुण आणि टॉलीवूड इंडस्ट्रीतील बाहुबली फेम राणा डग्गुबती यांना या प्रकरणी ईडीने आधीच समन्स बजावले होते. पुरावे मिळेपर्यंत टॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींना साक्षीदार मानले जाईल. तपासात नाव आलेल्या सर्व सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

Rakul Preet Singh
OTT Platform and Cinema : मोठमोठ्या कलाकारांना भुरळ पाडतोय ओटीटी प्लॅटफॉर्म

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रकुल प्रीत सिंगला चौकशीसाठी बोलावले होते. खरं तर, सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केलेल्या चौकशीदरम्यान रकुल प्रीत सिंगचे नाव समोर आले. ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर 20 पानांचे निवेदन दिले होते. रियाने तिच्या वक्तव्यात बॉलीवूडच्या 25 सेलिब्रिटींची नावे घेतली. यामध्ये रकुल प्रीत सिंगच्या नावाचाही समावेश होता. मात्र, चौकशीत रकुलने तिच्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

रकुल प्रीत सिंगने तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली होती. तिने तेलुगु चित्रपट कीर्तम आणि तमिळ चित्रपट थदैयारा ठक्का द्वारे पदार्पण केले होते. साऊथमध्ये नाव कमावल्यानंतर रकुलने 2014 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com