'या' तीन फॅशन डिझायनर्सची ईडीकडून होणार चौकशी

'या' तीन फॅशन डिझायनर्सची ईडीकडून होणार चौकशी
मनिष मल्होत्रा

मुंबई -  बॉलिवूड (Bollywood) क्षेत्रातील प्रसिद्ध तीन फॅशन डिझायनर (Fashion designer) मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीच्या (Ed) रडारवर आहेत. ईडीने मनिष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार यांना नोटीस पाठवून चौकशी करण्यास बोलावलं आहे. पंजाबमधील एका काँग्रेस नेत्यांनी मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशी सुरु आहे. या नेत्यांकडून तीनही फॅशन डिझायनर्सला लाखो रुपयांची रोकड दिल्या गेल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. (ED will investigate these three fashion designers)

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार या तीनही डिझायनर्सकडून आयकर नियमांचं उल्लंघन केले असल्याचा आरोप आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या अभिनेते - अभिनेत्री नंतर फॅशन डिझायनर्सही ईडीच्या रडारवर आहेत. 

पंजाब राज्यातील एका काँग्रेस पक्षाच्या पक्षाच्या नेत्याच्या घरी लग्नाच्यावेळी या तीन फॅशन डिझायनर्सना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आला होता. हे पैसे त्यांना कॅशमध्ये देण्यात आले होते. हे पैसे जे आहेत ते मनी लाँडरिंग या  प्रकरणातून मिळाले होते. असा आरोप त्या नेत्यांवरवर आहे. तेच पैसे तिघांना देण्यात आला होता. ते पैसे जे आहेत ते मनी लाँडरिंग प्रकरणातून मिळवले होते, असा आरोप त्या नेत्यावर आहे. हे पैसे या तिघांना देण्यात आले होते. यामुळे तीनही फॅशन डिझायनर्सना ईडीने वेगवेगळ्या तारखां देऊन बोलावलं आहे. त्यांनी हे पैसे कॅशमध्ये का घेतले? किती घेतले? याबद्दल चौकशी ईडी करणार आहे. 


या तिन फॅशन डिझायनर्सनी कॅश पेमेंट घेऊन, त्यावर कर भरला नाही हा देखील एक प्रकारचा गुन्हा आहे. मनिष मल्होत्रा, सब्यसाची आणि रितु कुमार ही फॅशन डिझायनमधील मोठी नावं आहेत. त्यामुळे या तिघांना नोटिस पाठवल्यामुळे या क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com