'हिज स्टोरी' वेबसीरिज प्रकरणात एकता कपूरने मागितली माफी

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 12 एप्रिल 2021

‘हिज स्टोरी’ वेबसीरीज समलैंगिक जोडप्यावर आधारीत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एकता कपूरने (Ekta Kapoor) आगामी वेबसीरीजचे पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले होते. त्यानंतर 'हीज स्टोरी' चे पोस्टर चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. ‘हिज स्टोरी’ वेबसीरीज समलैंगिक जोडप्यावर आधारीत आहे. या सीरीजच्या पोस्टरवर मृणाल दत्त आणि सत्यदीप मिश्रा दिसत आहे. या वेब सीरीजचे पोस्टर सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर यापूर्वी 2015 मध्ये प्रदर्शीत झालेला चित्रपट 'LOVE' चे दिग्दर्शक सूधांशू सरिआ आणि जहीन बक्षी यांनी पोस्टर चोरी केल्याचा आरोप केला होता. आता अल्ट बालाजीने या प्रकरणीसंबंधी माफी मागितली आहे.

'9 एप्रिल रोजी आम्ही हिज स्टोरीचे पोस्टर प्रदर्शित केले आणि तेव्हा आम्हाला सुधांशू यांचा चित्रपट 'LOVE' बाबत समजले. दोन्ही पोस्टर सारखेच दिसणे हा कोणता योगायोग नाही. ही आमच्या डिझाइन टीमची चूक आहे. आणि त्यासाठी आम्ही माफी मागतो’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे. (Ekta Kapoor apologizes in His Story webseries case)

 

एकता कपूरचा पोस्टर चोरीचा पहिलाच प्रकार नाही याआगोदरही द मॅरीड वुमन’ या सिनेमाच्या पोस्टरवरुनही मोठा वाद निर्माण झाला होता. एकता कपूरच्या ‘हिज स्टोरी’ या वेब सीरीजमध्ये एका साधारण कुटुंबातील पुरुषाचे समलैंगिक संबंध आणि ते समजल्यानंतर त्याच्या पत्नीला बसलेला धक्का, कुटुंबासमोर उभे राहिलेला प्रश्न, त्यातून निर्माण झालेला तणाव हे कथानक पहायला मिळणार आहे.

 

संबंधित बातम्या