‘फिल्मसिटी’ चा होतोय भास! सिनेरसिकांनी व्यक्त केल्या भावना

गोव्यातील (Goa) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) म्हणजे म्हणजे आम्हा सिनेसरसिकांसाठी पर्वणीच.
‘फिल्मसिटी’ चा होतोय भास! सिनेरसिकांनी व्यक्त केल्या भावना
International Film Festival of IndiaDainik Gomantak

पणजी : गोव्यातील (Goa) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) म्हणजे म्हणजे आम्हा सिनेसरसिकांसाठी पर्वणीच. लाइट्स, कॅमेरा, ॲक्शनच्या सिनेसृष्टीत फिरताना इफ्फीचा परिसर म्हणजे कुठली तरी फिल्मसिटी असल्याचा भास होतोय, असे मत सिनेरसिकांनी व्यक्त केले. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान सिनेमाची दुनिया जगताना मजा येते. त्यातच गोव्यात ते आयोजित केल्यामुळे आम्हाला इफ्फी आता आपलीच वाटते, असेही ते म्हणतात. मी पणजीत काम करतो. त्यामुळे इफ्फी म्हणजे काय ते मला यात प्रत्यक्ष भाग घेतल्यानंतर पाहायला मिळाले. काम आटोपल्यानंतर रात्री असणारे सिनेमा मी पाहातो. इतके कलाकार येतात त्यांनाही बघण्याची संधी मला मिळाली आहे.

आठ दिवसाच्या इफ्फी महोत्सवादरम्यान गोवा मनोरंजन सोसायटी आणि आयनॉक्स, कला अकादमी व पणजीतील बहुतांश भागात केलेली रोषणाई, तसेच अन्य सजावट मनमोहक असते.

- केदार नाईक (नोकरदार)

International Film Festival of India
सिनेमांतून वाढणार खिलाडूवृत्ती..!

आठ दिवस सिनेमाच सिनेमा तसेच टीव्हीवर दिसणाऱ्या कलाकारांना प्रत्यक्ष जवळून पाहायची संधी इफ्फीच्या निमित्ताने मिळते. मला इफ्फी महोत्सव खूप आवडतो. त्याशिवाय पणजी नवरीसारखी नटते.

- अंजली मापारी, विद्यार्थी

गोव्यात इफ्फीचे आयोजन होत असल्यामुळे गोमंतकातील कलाकारांना सिनेसृष्टी, तसेच कलाकारांचे जीवन, त्यांच्या कामाची पध्दत जवळून घेण्याची चांगली संधी मिळते. इफ्फी फक्त पणजीपुरतीच मर्यादित न राहाता, त्याला गोव्यातील इतर भागांतही पणजीसारखेच पोहोचवले पाहिजे. गोवा कलाकारांची खाण आहे, त्यामुळे इफ्फी म्हणजे काय, हे ग्रामीण भागातील कलाकारापर्यंतसुध्दा पोहोचवणे महत्त्वाचे आहे.

- दयानंद मांद्रेकर, (निवृत्त शिक्षक)

इफ्फी महोत्सवादरम्यान जगभरातील सिनेमे येतात. त्यामुळे सिनेमातून, त्या त्या ठिकाणची संस्कृती, तेथील राहणीमान, भौगोलिक रचना, जगण्याची धडपड अशा बाबी सिनेमातून मांडल्या जातात. सिनेमे विचार करायला भाग पाडतात. पूर्वीचा सिनेमा आणि आताचे सिनेमा यात अमूलाग्र बदल झाला आहे. इफ्फीत निवडलेले सिनेमे हे दर्जेदार असतात.

- स्मिता भंडारे कामत, शिक्षक

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com