मनोरंजन उद्योग महाराष्ट्रातून गोव्यात; टिव्ही शो चे शूटिंग लोकेशन बदलले

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

एकता कपूरच्या कुंडली भाग्य या सिरीयलचं शूटिंग गोव्यात होणार आहे. श्रद्धा आर्या आणि धीरज धोपर मुख्य भूमिकेत आहेत. या  शो चे कलाकार आणि क्रू आधीच गोव्याला रवाना झाले आहेत आणि लवकरच तिचे चित्रीकरण सुरू होणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्यात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे मराठी आणि हिंदी मालिका-चित्रपट निर्मात्यांनी राज्याबाहेर जाऊन चित्रीकरण करण्यास सुरुवात केली आहे. हे नियम अशाच प्रकारे वाढत राहीले तर मनोरंजन उद्योग राज्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कडक निर्बंध घालून का होईना राज्यात चित्रिकरणाला परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

विशेषत: महाराष्ट्रात कोविड -19 च्या रूग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच राज्यात 15 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केले आहे. मुंबईतील शूटिंग थांबविल्यामुळे टीव्ही आणि चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. मात्र असे असले तरी शो च्या निर्मात्यांनी सिरियलच्या एपिसोडची साखळी तुटू नये म्हणून शूटची स्थाने शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. 

राधे साठी नो किसिंग नियम मोडल्याने भाईजान चर्चेत 

फोर लायन्स प्रॉडक्शन निर्मित सुंबुल तौकीर आणि गश्मीर महाजानी स्टारर इमली या सिरीयल चे शूटींग हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये स्थानांतरित होणार आहे. या शोचा कलाकार आणि क्रू आतापर्यंत मुंबईत शूटिंग करत होते. पण आता लवकरच हैदराबादला या सिरीयलचं शूटींग सुरू होणार आहे. याशिवाय वाहिनीचे इतर लोकप्रिय शो, गुम है किसीके प्यार में आणि अनुपमा या सिरीयलचे पण शुटींग हैदराबादला स्थलांतरीत करण्यात आले आहे. 

एकता कपूरच्या कुंडली भाग्य या सिरीयलचं शूटिंग गोव्यात होणार आहे. श्रद्धा आर्या आणि धीरज धोपर मुख्य भूमिकेत आहेत. या  शो चे कलाकार आणि क्रू आधीच गोव्याला रवाना झाले आहेत आणि लवकरच तिचे चित्रीकरण सुरू होणार आहे. याशिवाय, केवळ कुंडली भाग्यच नाही तर बालाजी टेलिफिल्म्सने कुमकुम भाग्य, मोल्की आणि ये है चाहते यासह सर्व सिरीयलचे शूटींग गोव्यात स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सिरियल प्रमाणेच इतर सिरियलच्या दिग्दर्शकांनी शूट लोकेशन हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही सिरियलचे शूट लोकेशन आतापर्यंत महाराष्ट्रत होते पण राज्यातील वाढत्या घटनांमुळे निर्मात्यांनी हैदराबादला जाण्याचा विचार केला आहे.

राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आल्याने चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली आहे. आहे. बाहेर सगळीकडे बंदी असल्याने घरातच अडकून पडलेल्या टिव्ही प्रेक्षकांसाठी मालिका-चित्रपट हे मनोरंजनाचे मुख्य माध्यम आहे. मात्र सध्याची परिस्थीती बघता चित्रीकरणावरच बंदी आल्याने राज्यातील मनोरंजन उद्योग ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. 
 

संबंधित बातम्या