Esha Gupta in Cannes Film Festival: कान्सच्या पहिल्याच दिवशी ईशा गुप्ताचा रेड कार्पेटवर बोल्ड ड्रेससह कहर..फोटो व्हायरल

अभिनेत्र ईशा गुप्ताने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी आपल्या ड्रेसने सर्वांना आकर्षित केले.
Esha Gupta in Cannes Film Festivel
Esha Gupta in Cannes Film FestivelDainik Gomantak

Esha Gupta in Cannes Film Festival: फ्रान्समध्ये सध्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे ,साहजिकच जगातली एक महत्त्वाची फिल्म इंडस्ट्री असणाऱ्या बॉलिवूडच्या तारकाही आणि तारेही यात सहभागी होतात.

कान्सला यापूर्वा ऐश्वर्या रॉय, सोनम कपूर, विद्या बालन आणि दीपिका पदूकोनही सहभागी झाल्या होत्या. यावर्षीच्या फिल्म फेस्टिवलचा पहिलाच दिवस अभिनेत्री ईशा गुप्ताने गाजवला आहे.

16 मेपासून सुरू झालेल्या या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने धुमाकूळ घातला. ईशा गुप्ताने अतिशय बोल्ड ड्रेस परिधान केला होता. यावेळी सर्वांच्या नजरा तिच्यावर पडल्या. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याला ईशा गुप्ता उपस्थित होती.

2023 ला रेड कार्पेटवर चालणारी ईशा पहिलीच

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 च्या रेड कार्पेटवर चालणारी ईशा गुप्ता ही पहिली भारतीय सेलिब्रिटी आहे. ती हाय स्लिट गाऊनमध्ये फिरताना सर्वांनी पाहिलं.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मधील ईशा गुप्ताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल फोटो पाहुन ईशाचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत

ईशाचा शेअर केला व्हिडीओ

ईशा गुप्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते आहे की कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये भारत सरकारच्या प्रतिनिधी मंडळाचा भाग बनून ती खूप आनंदी आहे. 

ईशा गुप्ता म्हणाली, 'मी भारत सरकार आणि FICCI चे आभार व्यक्त करू इच्छिते. चित्रपटसृष्टीत भारत आता जागतिक व्यासपीठावर आहे. चित्रपटसृष्टीसह संपूर्ण जगासमोर माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

Esha Gupta in Cannes Film Festivel
ED Raid On LYCA Productions : RRR आणि पोन्नियन सेल्वनच्या निर्मात्यांवर ईडीची धाड...

या अभिनेत्रीही दिसणार कान्समध्ये

ईशा गुप्ता व्यतिरिक्त, यावेळी कान्स 2023 मध्ये पदार्पण करणाऱ्या भारतीय सुंदरींमध्ये मृणाल ठाकूर, सारा अली खान, अनुष्का शर्मा आणि मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर दिसणार आहेत.

गायक कुमार सानूची मुलगी के शॅनन देखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 16 मे ते 27 मे पर्यंत चालणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com