'दोस्ताना 2' च्या सेटवरून 'या' अभिनेत्याची हकालपट्टी
dostana 2

'दोस्ताना 2' च्या सेटवरून 'या' अभिनेत्याची हकालपट्टी

2008  मध्ये प्रदर्शित झालेल्या दोस्ताना या विनोदी चित्रपटाच्या सिक्वेलची तयारी सुरू झाली आहे. मागील चित्रपटात प्रियंका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, तर या सिक्वेल चित्रपटामध्ये जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन आणि लक्ष्य लालवाणी मुख्य भूमिकेत होते. 2019 मध्ये शूटिंग सुरू झाल्यानंतर या चित्रपटाचे पहिले वेळापत्रकही पूर्ण झाले असले तरी आता कार्तिक आर्यनला चित्रपटातून काढून टाकल्याची बातमी येत आहे. बॉलिवूडच्या यंग स्टार्सच्या यादीत कार्तिक आर्यन याचे नावदेखील समाविष्ट आहे. बॅक टू बॅक कार्तिकने अनेक हिट्स चित्रपट देऊन ए ग्रेड स्टार्सच्या यादीमध्ये प्रवेश केला आहे. अलीकडेच, कार्तिकने आपली ड्रीम कार लॅम्बोर्गिनी विकत घेतली होती. पण आता कार्तिकशी संबंधित अशा बातम्या येत आहेत, ज्यामुळे कार्तिकच्या चाहत्यांचीही चिंता वाढली आहे. कार्तिकला 'धर्मा प्रोडक्शनने' आपल्या ' दोस्ताना 2 'चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला असल्याचे वृत्त आहे. 


कार्तिक आर्यनने या चित्रपटाच्या शूटिंगला 20 दिवस पूर्ण केले होते. असे असूनही कार्तिकला चित्रपटातून काढून टाकण्यात आले आहे. तसेच, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये देखील बंदी घातली आहे. म्हणजेच भविष्यात कार्तिक आर्यन करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसच्या कोणत्याही चित्रपटात काम करू शकणार नाही. धर्मा प्रॉडक्शनशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिकच्या विरोधात घेतलेल्या या कठोर पावलासाठी तो स्वत: जबाबदार आहे.  बर्‍याचदा सांगूनही कार्तिक  त्यांना 'दोस्ताना 2' च्या शूटिंगसाठी तारखा देत नव्हता अशी माहिती  'दोस्ताना 2' च्या सेटवरच्या लोकांनी दिली आहे.  नको असूनही धर्म प्रोडक्शनला कार्तिकच्या विरोधात हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे अशी माहिती धर्मा प्रोडक्शनच्या सेटवर देण्यात आली आहे. कार्तिक आर्यन हे करण जोहरचे पुढील बळी असल्याचे सोशिअल मीडियामध्ये म्हटले जात आहे.  करण जोहर, अभिनेता सुशांत सिंग राजपूत नंतर आता कार्तिक आर्यनची प्रतिमा खराब करण्यासाठी मागे पडला आहे असेही सोशिअल मीडियामध्ये म्हटले जात आहे.

गेल्या वर्षी सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर करण जोहरने सुशांतला त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटांमधून बंदी घातल्याचे उघड झाले होते. ज्यामुळे त्याला इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. आता करण जोहर कार्तिक आर्यनच्या पाठीमागे लागला आहे असे कार्तिकचे चाहते बोलत आहेत . मात्र, अद्याप या संपूर्ण प्रकरणावर करण जोहर किंवा कार्तिक आर्यनकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com