फेसबुकमुळे सयानीला मिळाली शाहरुखसोबत काम करण्याची संधी
फेसबूकमुळे सायानीला मिळाली शाहरुखसोबत काम करण्याची संधी Instagram /@sayanigupta

फेसबुकमुळे सयानीला मिळाली शाहरुखसोबत काम करण्याची संधी

सयानीने तिच्या बॉलीवुड करियची सुरुवात 'सेकंड मॅरेज डॉट कॉम' या चित्रपटातून केली.

बॉलीवुड अभिनेत्री सयानी (Sayani Gupta) गुप्ता तिच्या हटके व्यक्तिरेखेसाठी ओळखली जाते. तिने चौकटीबाहेरच्या भूमिका (Role) साकारात लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केली आहे. आज ती 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने 2012 मध्ये बॉलीवुडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. सयानीने तिच्या बॉलीवुड करियची सुरुवात 'सेकंड मॅरेज डॉट कॉम' या चित्रपटातून केली. सयनीने शाहरुखसोबत 'फॅन' या चित्रपटामध्ये काम केले आहे.

सयानी गुप्ताने "जॉली एलएलबी 2', 'आर्टिकल 15', 'फोर मोअर शॉट्स' या वेब सिरिजमध्ये काम केले आहे. सयानीला फेसबुकच्या माध्यमातून शाहरुख खानसोबत करण्याची संधी मिळाली, ज्याबद्दल तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

* फेसबूकमुळे मिळाले शाहरुखसोबत काम करण्याची संधी

सयनीने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ती फेसबूकवर असेच मेसेज पाहत होती. तेव्हा यशराज फिल्मचा कास्टिंग डायरेक्टर शानू यांचा मॅसेज पाहून तिला धक्का बसला. त्यांचा मॅसेज होता की , तुम्ही आमच्या कार्यालयातआम्हाला भेटायला येऊ शकता का? तिने त्यांचा मॅसेज विचारलेली मुदत संपल्ल्यानंतर पाहिला होता. त्यानंतर तिने त्या मॅसेजकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर पुन्हा तिला मॅसेज आला की, तुम्ही जर तुम्ही हा मॅसेज पाहिला असेल तर, आम्हाला भेट द्या.

फेसबूकमुळे सायानीला मिळाली शाहरुखसोबत काम करण्याची संधी
गोव्यातील गावकऱ्यांची व्यथा मांडणारा 'भूमिपुत्र'

नंतर ती शानु यांना भेटायला गेली. त्यानंतर ऑडिशनची प्रक्रिया सुरू झाली. पण संपूर्ण वेळ जेव्हा मी चित्रपटासाठी ऑडिशन देत होते, तेव्हा मला माहीत नव्हते की चित्रपट कशाबद्दल आहे आणि कथा काय आहे. मला एवढेच माहीत होते की हा यशराजचा चित्रपट आहे. मला याची सुद्धा कल्पना नव्हती की अभिनेता शाहरुख खान या चित्रपटाचा भाग असणार आहे.

त्यानंतर मला फोन आला की मला या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. अभिनेता शाहरुख खान या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असेल. हे माझ्यासाठी स्वप्न अस्तित्वात आल्यासारखे होते. माझा विश्वास बसत नव्हता की, मी शाहरुख खानसोबत काम करणार आहे. सयनीने या चित्रपटात आर्यनच्या मॅनेजरची भूमिका साकारली होती

Related Stories

No stories found.