The Family Man-2 Trailer : ब्यूटी गर्ल पहिल्यांदाच दिसणार विलनच्या भूमिकेत

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

उद्या असे काहीतरी घडणार आहे, ज्याचा आपण विचारही करू शकणार नाही.

मिर्झापूर 2 (Mirzapur-2) नंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरती सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेली सिरीज म्हणजे अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) ची द फॅमिली मॅन सिरीज (The Family Man). ही प्रतिक्षा 12 फेब्रुवारी रोजी संपणार होती, परंतु जानेवारीच्या सुरुवातीला प्राईमची वेब सिरीज तांडववरून खूप राजकीय वाद झाला आणि निर्मात्यांना द फॅमिली मॅन सीझन 2 चे रिलीज पुढे ढकलावे लागले होते. पण आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण अॅमेझॉन प्राईमने या बहुप्रतिक्षित सीरिजच्या दुसर्‍या हंगामाविषयी पहिली अधिकृत घोषणा केली आहे. उद्या (19 मे) फॅमिली मॅन 2 चा ट्रेलर रिलीज होत आहे. अॅमेझॉनने भाग दोनच्या नवीन पोस्टरद्वारे याची पुष्टी केली आहे.(Beauty Girl will be seen for the first time in the role of a villain)

'ती' ची गोष्ट, जबरदस्त आणि अभिनय बिनधास्त,  या पाच वुमन लिड सिरीजमधुन...

उद्या असे काहीतरी घडणार आहे, ज्याचा आपण विचारही करू शकणार नाही. ट्रेलर उद्या येत आहे असे प्राईमच्या अधिकृत ट्विटर हॅंन्डलवरती लिहिलेले आहे. दुसऱ्या भागात मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) सोबत समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) मुख्य विलेनच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरवरती मनोज सोबत समंथा अक्किनेनीही दिसत आहे. समंथाचा भूमिकेचे नाव राजी आहे.  त्याचवेळी राज आणि डीके या सीरिजच्या दिग्दर्शक जोडीने सांगितले की, द फॅमिली मॅन 2 चा ट्रेलर उद्या सकाळी 9 वाजता प्रदर्शित होणार आहे. या सिरीजमध्ये शरिब हाश्मी, प्रियामनी, श्रेया धनवंतरी, सनी हिंदुजा, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महेक ठाकूर यांच्यासह मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

तांडवच्या वादविवादाचा परिणाम फॅमिली मॅन 2 वरती
जानेवारीत रिलीज झालेल्या सैफ अली खानच्या वेब सिरीज तांडवच्या वादविवादाच्या आणि पोलिस प्रकरणानंतर अ‍ॅमेझॉन प्राईमचे अधिकारी खूप सावध झाले आणि द फॅमिली मॅन 2 मध्ये काही संभाव्य आक्षेपार्ह तथ्ये असतील तर ते काढून घेण्यात यावे यासाठी वेळ घेतला. शेवटी, सर्व चेक पॉइंट्स यशस्वीरित्या ओलांडल्यानंतर फॅमिली मॅनचा दुसरा सीझन रिलीजसाठी सज्ज झाला आहे.

संबंधित बातम्या