प्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचं शूट तात्काळ थांबविलं

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

माहितीनुसार आणि आलेल्या रिपोर्टनुसार, त्यांना चित्रपटाच्या सेटवर कोरनाची लागन झाल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या गगूबाई काठियावाडी  या चित्रपटाचे शूट तात्काश थांबविण्यात आले आहे.

मुंबई: प्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी जे आपल्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना कोरोनाची लागन झाली आहे. माहितीनुसार आणि आलेल्या रिपोर्टनुसार, त्यांना चित्रपटाच्या सेटवर कोरनाची लागन झाल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या गगूबाई काठियावाडी  या चित्रपटाचे शूट तात्काश थांबविण्यात आले आहे.

भन्साळी यांना त्यांच्या कार्यालयात क्वॉरंटाइन ठेवण्यात आले आहे आणि त्याच्या आईनेही कोविड19 ची टेस्ट दिली आहे. या आलेल्या चाचणीनंतर गंगूबाई काठियावाडी  या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री आलिया भट्ट हिलाही वेगळे ठेवण्यात आले आहे आणि कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. त्यासाठी तीच्या टेस्टच्या रीपोर्टची वाट बघितली जात आहे. चित्रपटाच्या उर्वरित कास्ट आणि सहकाऱ्यांची देखील चाचणी घेण्यात येत आहे.

Corona Update:  महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर या जिल्ह्यात 16 हॉटस्पॉट्स; 31 मार्च पर्यंत कडक लॉकडाउन जाहीर 

दरम्यान रणबीर कपूरनला ही कोरोनाची लागण झाल्याची बातमी पुढे आली आहे. सध्या तो क्वॉरंटाइन आहे.. ही माहिती नीतू कपूर यांनी दिली आहे. रणबीर कपूरच्या तब्येतीबाबत अनेक अंदाज बांधले जात होते. नीतू कपूरने त्याच्या प्रकृतीविषयी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून रणबीर कपूरच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या